शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi : "देशानं माझ्यावर केवळ प्रेमच केलं नाही, तर जोडेही मारले..."; जाणून घ्या राहुल गांधी नेमकं काय म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 18:29 IST

आपल्याला सत्तेचा कसलाही मोह नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे...

नवी दिल्ली - या देशाने मझ्यावर केवळ प्रेमच केले नाही, तर मला जोडेही मारले आहेत. या देशाने मला शिकण्यासाठी मारले आहे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याचवेळी, भारत आपल्यासाठी एका प्रेमिकेप्रमाणे आहे, जसा आहे, आपण त्यावर एका प्रियकराप्रमाणे प्रेम करतो आणि त्याला समजण्याचा प्रयत्न करतो, असेही राहुल म्हणाले, ते एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी, आपल्याला आजही सत्तेचा मोह नाही, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. तसेच, काही लोक सकाळपासून सायंकाळपर्यंत सत्ता कशी मिळवता येईल, याचाच विचार करतात. मात्र, आपण सत्तेत जन्माला आलो असतानाही आपल्याला त्यात रस नाही, असेही केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी कुणाचेही नाव न घेता म्हणाले.

देशाने केवळ प्रेमच केले नाही, तर जोडेही मारले - राहुल गांधी'द दलित ट्रूथ: द बॅटल्स फॉर रियलायझिंग आंबेडकर्स व्हिजन' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना राहुल म्हणाले, 'देशाने मझ्यावर केवळ प्रेमच केले नाही, तर मला जोडेही मारले आहेत. नाही, तुम्ही समजू शकत नाही. या देशाने मला किती जोराने आणि किती हिंसेने मारले आहे. मी विचार केला, की हे काय सुरू आहे आणि उत्तर मिळाले, की देश मला शिकवू इच्छित आहे. देश मला सांगतोय की तू शिक, तू समजून घे. त्रस झाला तरी काही नाही, शिक आणि समजून घे.'

देशला प्रियकरासारखे समजू इच्छितो - राहुल गांधी म्हणाले, 'मी देशाला अगदी अशा प्रकारे समजण्याचा प्रयत्न करत आहे, जसे एक प्रियकर एखाद्यावर प्रेम करतो आणि तिला समजून घेऊ इच्छितो.' याचवेळी, निवडणुकीतील आपल्या यशापयशावर बोलताना राहुल म्हणाले, "माझ्या देशाने मला दिलेले प्रेम, हे माझ्यावरील ऋण आहे. हे ऋण कसे फेडायचे, याचा विचार मी करत राहतो. देशानेही मला धडा शिकवला आहे... देश मला सांगतो आहे, की तू शिक आणि समजून घे. माझ्या देशाने कुठलेही कारण नसताना माझ्यावर एवढे प्रेम केले आहे. हे माझ्यावर देशाचे ऋण आहे, यामुळेच मी देशाला समजून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndiaभारत