शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर आज घटनापीठ करणार सुनावणी; भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 06:54 IST

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली.

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावामुळे त्यांचे निर्णय बाधित होतात काय, हा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरलेला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणीसाठी येणार आहे.

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. त्यामुळे अरुणाचल प्रदेश विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नबाम रेबिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐरणीवर आला होता. 

हा निकाल का महत्त्वाचा?सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण गवई, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. सूर्यकांत, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या सात सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणीची औपचारिक रूपरेषा आज ठरण्याची शक्यता आहे. ही सुनावणी दीर्घकाळ चालण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होणार नसला तरी संभाव्य निकाल भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले. 

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणीशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणांच्या याचिकांवर  शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीठापुढे एकत्र सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निकालपत्रात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपविले होते. 

सेना पक्ष व चिन्ह सुनावणी लांबणीवरशिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या प्रकरणी गुरुवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. 

नबाम तुकी प्रकरण नेमके काय?- २०१६ साली अरुणाचल प्रदेशमधील तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे बरखास्त केलेले सरकार पुन्हा बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. - या प्रकरणात १४ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय रोखण्याचा गुवाहाटी न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. - २०१६ साली अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी तत्कालीन राज्यपालांना १४ जानेवारी २०१६ रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याची विनंती केली होती. - राज्यपालांनी एक महिना आधीच १६ डिसेंबर २०१५ रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलाविले. त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला. - मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी विधानसभा भवनालाच कुलूप लावले होते तसेच विधानसभेचे अधिवेशन विनंती केलेल्या वेळेच्या आधीच बोलाविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला तुकी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरविला होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे