शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एकाच प्रियकरासोबत होते नववधू आणि तिच्या आईचे संबंध, अनैतिक संबंधांच्या गुंत्यात गेला पतीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 15:07 IST

Telangana Crime News: तेलंगाणामधील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यांमधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले आहे.

तेलंगाणामधील कुरनूल येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यांमधील फसवणुकीमधून घडलेल्या या गंभीर गुन्ह्यामध्ये एका नवविवाहित महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये मृत व्यक्तीची पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांचा समावेश आहे. या दोघींचेही एका बँक कर्मचाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. मात्र ही घटना घडल्यापासून तो फरार आहे.  

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत तेजेश्वर याच्या कुटुंबीयांनी १३ फेब्रुवारी रोजी कुरनूल येथील ऐश्वर्या नावाच्या तरुणीसोबत त्याचं लग्न ठरवलं होतं. मात्र या लग्नापूर्वी पाच दिवस आधी ही नववधू ऐश्वर्या फरार झाली होती. ती कुरनूलमधील एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेल्याची कुजबूज सुरू होती. मात्र ती १६ फेब्रुवारी रोजी परत आली. तसेच आईवर हुंड्याची व्यवस्था करण्यासाठी दबाव असल्याने आपण एका मित्राच्या घरी गेले होते, असे तिने सांगितले.

तिने भावूक होत तेजेश्वर याच्याकडे आपल्या प्रेमाची साक्ष दिली. तसेच १८ मे रोजी या दोघांचंही लग्न झालं. मात्र लग्नानंतर या दोघांच्याही संसारात अडचणी येऊ लागल्या. ऐश्वर्या ही तासनतास कुणाशी तरी बोलत असल्याचं तेजेश्वरच्या निदर्शनास आलं. अखेर १७ जून रोजी तेजेश्वर अचानक बेपत्ता झाल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. त्याच्या भावाने तेजेश्वर बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये धक्कादायत माहिती समोर आली.

या प्रकरणी तेजेश्वरची पत्नी ऐश्वर्या आणि तिच्या आईची पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी आपले एका बँक कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले. सुजाता हिचे त्या बँक कर्मचाऱ्याशी दीर्घकाळापासून संबंध होते. तर नंतर ऐश्वर्याही त्याच्याशी संबंध ठेवू लागली. त्यांचा कॉल डेटा तपासला असता ऐश्वर्या हिने लग्नानंतर तब्बल २ हजार वेळा या बँक कर्मचाऱ्याशी संवाद साधल्याचे उघड झाले.

दरम्यान, या हत्येमागे तेजेश्वरची संपत्ती आणि ऐश्वर्यासोबत संबंध कायम ठेवण्यास असलेला विरोध ही कारणं असू शकतात, असा पोलिसांचा अंदाज आहे. यासाठी सदर बँक कर्मचाऱ्याने सुपारी दिलली होती. तसेच त्यासाठी आपल्या ड्रायव्हरलाही त्यांच्यासोबत पाठवले होते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणाrelationshipरिलेशनशिप