शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१ फेब्रुवारी १९८६ राेजी अयाेध्येत काय घडले हाेते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 11:37 IST

अयाेध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त परिसराला पूजेसाठी खुले करण्याची मागणी त्यातून करण्यात आली हाेती.

वादग्रस्त वास्तूचा परिसर १ फेब्रुवारी १९८६ राेजी जिल्हा सत्र न्यायाधीशांच्या आदेशानंतर खुला करण्यात आला हाेता.  जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडून आदेशाचे तत्काळ पालन झाले. त्यानंतर भारताचे राजकारण बदललेच, शिवाय सामाजिक रचनेवरही माेठा परिणाम झाला. उमेशचंद्र पांडे नावाच्या तरुण वकिलाने या घटनेच्या जवळपास वर्षभरापूर्वी जानेवारी १९८५मध्ये फैजाबादच्या कनिष्ठ न्यायदंडाधिकाऱ्यांसमाेर एक याचिका दाखल केली हाेती. अयाेध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त परिसराला पूजेसाठी खुले करण्याची मागणी त्यातून करण्यात आली हाेती.

२८ जानेवारी १९८६ राेजी कनिष्ठ न्यायदंडाधिकारी हरिशंकर दुबे यांनी याचिका फेटाळली. त्यानंतर पांडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली. तेथे तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायमूर्ती कृष्णमाेहन पांडेय यांनी १ फेब्रुवारीला सुनावणी घेतली आणि लाेकांना वादग्रस्त परिसरात पूजा करण्याची परवानगी दिली. जिल्हाधिकारी इंदुप्रकाश पांडे आणि वरिष्ठ पाेलिस अधीक्षक कर्मवीर सिंह यांना वादग्रस्त परिसराचे कुलूप उघडण्याचे आदेशही दिले. प्रशासनाने त्यावर तत्काळ कार्यवाही केली. आदेश प्राप्त हाेताच अवघ्या ४० मिनिटांमध्ये परिसराचे कुलूप उघडण्यात आले.

काळे वानर न्या. पांडेय यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काळ्या वानराचा उल्लेख केला हाेता. हे वानर या प्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या छतावर ध्वजस्तंभाला पकडून दिवसभर बसले हाेते. लाेकांनी त्याला खाऊपिऊ घातले. मात्र, त्याने काहीही खाल्ले नाही. मला ते वानर  दैवी शक्ती वाटली.

न्या. पांडेय यांना पदाेन्नती१९९०मध्ये न्या. पांडेय यांना पदाेन्नती देऊन उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली. व्ही. पी. सिंह सरकारने पांडेय यांना वगळता इतर सर्व न्यायाधीशांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. सिंह यांचे सरकार ७ नाेव्हेंबर १९९० राेजी पडले. त्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले. त्यांच्या सरकारमध्ये डाॅ. सुब्रमण्यम स्वामी यांनी कायदेमंत्रिपद स्वीकारले आणि पांडेय यांचे नाव मंजूर केले. अखेर १९९१मध्ये पांडे हे अलाहाबाद उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. १९९४मध्ये ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर