"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 03:22 PM2023-12-26T15:22:21+5:302023-12-26T15:24:48+5:30

भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते.

"That time was wrong for me"; PM Narendra Modi laughed and applauded Anju Bobby's George statement | "ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

"ते पाहून मला ईर्ष्या होते"; अंजू बॉबीच्या विधानावर मोदींनी हसून दिली दाद

भारतीय एथलेट राहिलेल्या अंजू बॉबी जॉर्जने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मनातील खंत बोलून दाखवली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित क्रिसमसच्या एका नरेंद्र मोदींसह दिग्गजांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात बोलताना अंजू बॉबीने नरेंद्र मोदींनी देशातील क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिल्याचं म्हटलं. बॉबी यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात खेळाबद्दल अधिक उत्साह नसल्याचे सांगितले.

मी चुकीच्या काळात देशाच्या क्रीडा क्षेत्रात कार्यरत होते. आता, भारतीय खेळाडूंना जो सन्मान, प्रेम मिळतंय ते पाहून मला ईर्ष्या होते, असे बॉबी जॉर्जने म्हटले. बॉबीच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्मीतहास्य करत दाद दिली. अंजू जॉर्जने मोदींकडे पाहून म्हटले की, एक खेळाडू म्हणून मी साधारपणे २५ वर्षे इथं आहे. या काळात देशातील क्रीडा क्षेत्रात मी खूप बदल पाहिला आहे. जेव्हा २० वर्षांपूर्वी मी भारतासाठी पहिलं जागतिक पदक जिंकलं होतं, तेव्हा माझा विभागही माझ्या प्रमोशनसाठी तयार नव्हता. मात्र, नीरज चोप्राने पदक जिंकल्यानंतर मी बदल अनुभवला. ज्या पद्धतीने आपण हा विजय सेलिब्रेट करतोय, मला ईर्ष्या होते, कारण मी खेळात चुकीच्या वेळेत होते, असे बॉबी जॉर्जने म्हटले. बॉबी यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदींनी हसून दाद दिली. 

महिला सशक्तीकरण आता केवळ शब्द राहिला नसून प्रत्येक भारतीय तरुणी, महिला स्वप्न पाहत आहे. कारण, त्यांना माहिती आहे, त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, असेही बॉबी यांनी म्हटलं. 

कोण आहे अंजू बॉबी जॉर्ज

अंजू बॉबी जॉर्ज ह्या भारतीय एथलेट राहिल्या आहेत
२००३ मध्ये पॅरिस येथे आयोजित जागतिक एथलेट चॅम्पियनशीपमध्ये लांब उडीत त्यांनी कास्य पदक जिंकले होते. 
जागतिक एथलेट चॅम्पियनशीपमध्ये लांब उडी क्रीडा प्रकारात ६.७० मीटर लांब उडी घेऊन कास्य पदक जिंकणारी अंजू बॉबी जॉर्ज ह्या पहिल्या भारतीय महिला एथलेट आहेत. 
२००५ मध्ये जागतिक एथलेटीक्स फायनलमध्ये अंजू बॉबीने सिल्व्हर मेडल जिंकले होते. ही कामगिरी त्या सर्वोत्तम मानतात. 
अंजू बॉबी जॉर्ज यांना जागतिक एथलेटिक्सने वुमन ऑफ द ईडर २०२१ पुरस्काराने सन्मानित केलं आहे.
अंजू बॉबी यांनी २०१६ साली मुलींसाठी खेळ अकॅडमीही सुरू केली, ज्यातून मुलींना क्रीडा क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी प्रेरीत केलं. 

Web Title: "That time was wrong for me"; PM Narendra Modi laughed and applauded Anju Bobby's George statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.