शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Congress President Election : थरूर की खरगे, काँग्रेस अध्यक्ष काेण? उद्या होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 07:03 IST

प्रतिनिधींच्या अभूतपूर्व उत्साहात देशभरात ९६ टक्के मतदान

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व उत्साहात एकूण ९ हजार ९०० पैकी सुमारे ९ हजार ५०० प्रदेश काँग्रेस समिती प्रतिनिधींनी मतदान केल्याची माहिती पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सोमवारी दिली. निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर बाजी मारणार याचा निकाल बुधवारी (दि.१९) लागणार आहे.

मिस्त्री म्हणाले की, एकूण मतदान सुमारे ९६ टक्के झाले. लहान राज्यांमध्ये ते जवळपास १०० टक्के झाले. केंद्रावर कोणतीही प्रतिकूल घटना घडली नाही. अंतर्गत लोकशाही म्हणजे काय हे काँग्रेस पक्षाने दाखवून दिले आहे. सकाळी १० वाजता दिल्ली मुख्यालयात आणि देशभरातील राज्य कार्यालयांतील पक्षाच्या मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. पाच वाजता मतदान संपले.

या दिवसाची खूप वाट पाहिली : सोनिया गांधीकाँग्रेस अध्यक्षपदाचे मतदान सुरू असताना, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या की, त्या या दिवसाची दीर्घकाळ वाट पाहत होत्या. सोनिया गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात एकत्र येऊन मतदान केले. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीदेखील मुख्यालयात  मतदान केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी येथील मुख्यालयात सर्वप्रथम मतदान केले. सरचिटणीस जयराम रमेश, अंबिका सोनी, अजय माकन आणि विवेक तनखा यासारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या मुख्यालयात मतदान केले. उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकातील बंगळुरूत तर शशी थरूर यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे मतदान केले. 

राहुल गांधींचे ‘कंटेनर बूथ’मध्ये मतदान३५०० किलोमीटरच्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील संगनकल्लू येथे मतदान केले.तेथे मतदानासाठी विशेष कॅम्प लावला होता. कंटेनरलाच पोलिंग बूथचे रूप दिले होते. राहुल गांधी यांच्यासह सुमारे ५३ सदस्यांनी मतदान केले. 

महाराष्ट्रात ५४२ प्रतिनिधींनी हक्क बजावलामुंबई : निवडणुकीत महाराष्ट्रात ९६ टक्के मतदान झाले असून, प्रदेश काँग्रेसच्या ५६१ पैकी ५४२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवनात मतदान पार पडले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेस