शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचा फोन अन् निवासस्थानी निघालेले संजय राऊत माघारी फिरत संसद भवनात पोहचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 10:17 IST

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संजय राऊत यांची अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील देण्यास राऊत यांनी नकार दिला.

नवी दिल्ली : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी संसद भवनात काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सावरकर यांच्यावर टीका करण्याच्या मुद्यावरून काँग्रेस आणि ठाकरे गटामधील तणाव आणि वाद संपुष्टात आला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी राऊत यांची अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेचा तपशील देण्यास राऊत यांनी नकार दिला. पण, भेटीनंतर सर्वकाही आलबेल असल्याचे ट्वीट केले.

सावरकरांबद्दलच्या राहुल गांधींच्या विधानावर वाद निर्माण झाला होता. सावरकरांविषयीच्या महाराष्ट्राच्या भावना अवगत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समजावून सांगितल्यानंतर  वाद संपला होता. हा वाद निवळल्यानंतर संजय राऊत व राहुल गांधी यांचे बुधवारी भेटण्याचे ठरले. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या या बैठकीला सोनिया गांधीही होत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट झाली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सर्व काही आलबेल आहे. चिंता नसावी, असे ट्वीट संजय राऊत यांनी अर्धा तास चाललेल्या या बैठकीनंतर केले आहे.

आमच्या श्रद्धा आहेत तशाच

सावरकरांवरील टीकेचा मुद्दा मविआच्या सोयीचा नाही. त्यांच्याविषयी आमच्या श्रद्धा आहेत तशाच राहतील. आमच्यासाठी ते आदर्श आणि वीरपुरुष आहेत. भाजपला सावरकरांवर अकारण प्रेमाचे ढोंग करण्याचे एक हत्यार मिळाले आहे ते थांबवले पाहिजे, अशी भूमिका आपण मांडली, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

खासदारकी गेल्यानंतर राहुल प्रथमच संसदेत

राहुल गांधी यांनी संजय राऊत यांना बुधवारी भेटण्यासाठी फोन केला तेव्हा राऊत संसद भवनात होते. सूरत न्यायालयाच्या निकालामुळे खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी राऊत यांना भेटण्यासाठी प्रथमच संसद भवनात पोहोचले. पण तोपर्यंत राऊत आपल्या निवासस्थानी परतले होते. राहुल गांधी संसदेत पोहोचून प्रतीक्षा करीत असल्याचे के. सी. वेणुगोपाल यांनी कळविल्यानंतर राऊत पुन्हा संसद भवनात परतले. राहुल गांधींसोबत त्यांची अनपेक्षितपणे सोनिया गांधींशीही भेट झाली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे