वडली खून खटल्यात दोघांची साक्ष

By Admin | Updated: April 5, 2016 00:15 IST2016-04-05T00:15:01+5:302016-04-05T00:15:01+5:30

जळगाव : वडली, ता.जामनेर येथील अफजल अब्दूल तडवी याच्या खून खटल्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व तिसरा साक्षीदार यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.

The testimony of the two accused in the murder case of the father | वडली खून खटल्यात दोघांची साक्ष

वडली खून खटल्यात दोघांची साक्ष

गाव : वडली, ता.जामनेर येथील अफजल अब्दूल तडवी याच्या खून खटल्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व तिसरा साक्षीदार यांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या.
अफजल तडवी हा जांभूळ शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेला होता. त्याने आरोपीच्या शेतासमोर असलेल्या गुरांच्या पाणी पाजण्याच्या हौदात शेळ्यांना पाणी पाजले होते. या गोष्टीचा राग आल्याने आरोपीने त्याच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार केल्याने गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयात सुरू आहे. पुढील कामकाज ६ एप्रिल रोजी होणार आहे. आरोपीतर्फे ॲड.अनिल नेमाडे काम पाहत आहेत.

Web Title: The testimony of the two accused in the murder case of the father