जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 00:56 IST2020-11-14T00:56:41+5:302020-11-14T00:56:47+5:30
अतिशय अत्याधुनिक असलेल्या या क्षेपणास्त्राला येथून जवळ असलेल्या चांदीपूरच्या इंटेग्रेटेड टेस्ट रेंजवरून दुपारी ३.५० मिनिटांनी डागण्यात आले.

जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी
बालासोर (ओदिशा) : भारताने क्वीक रिॲक्शन सर्फेस टू एअर मिसाईल (क्यूआरएसएएम) सिस्टीमची शुक्रवारी चाचणी यशस्वी केली. बालासोर येथील तळावरून उड्डाण केल्यानंतर क्यूआरएसएएम व्यवस्थेने पायलट नसलेल्या विमानाला (पीटीए) मध्यम रेंज आणि मध्यम उंचीवर थेट भेदून मोठे यश मिळवले, असे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
अतिशय अत्याधुनिक असलेल्या या क्षेपणास्त्राला येथून जवळ असलेल्या चांदीपूरच्या इंटेग्रेटेड टेस्ट रेंजवरून दुपारी ३.५० मिनिटांनी डागण्यात आले. या व्यवस्थेची सक्रीय असताना लक्ष्ये हुडकून काढून त्यांचा मार्ग शोधण्याची तसेच कमी वेळेत त्यांना मारण्याची क्षमता आहे. भारतीय लष्कराच्या स्ट्राईक कॉलम्सला हवाई संरक्षण देण्याची या व्यवस्थेची रचना करण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
या क्यूआरएसएएमचा आवाका सुमारे ३० किलोमीटरचा आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे त्याच्या व्यावसायिक उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.