शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दहशतवादी फक्त पुलवामा घडवून थांबणार नव्हते; पुढील हल्ल्याचीही तयारी झाली होती; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 08:30 IST

एनआयएच्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर

जम्मू: गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला. त्यात ४० जवानांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्या हल्ल्यानंतर दहशतवादी थांबणार नव्हते. पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंड आणि जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरसह इतर दहशतवादी दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी कारचीदेखील व्यवस्था केली होती. मात्र भारतीय हवाई दलानं बालाकोटवर एअर स्ट्राईक केला. भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकमुळे जैश-ए-मोहम्मदचं नुकसान झालं. जैशचा दहशतवादी तळ एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झाला. भारतानं घेतलेला आक्रमक पवित्रा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेला दबाव यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली. त्यामुळेच जैशला दुसरा दहशतवादी हल्ला घडवून आणता आला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अजहरनं एअर स्ट्राईकनंतर लगेचच दुसरा हल्ला रोखण्याचे आदेश दिले. मसूद अजहरचा भाचा उमर फारूक दुसऱ्या हल्ल्याच्या तयारीत होता. पण मसूदनं त्याला हल्ला रोखण्याच्या सूचना केल्या. पुलवामा हल्ल्यानंतर दीड महिन्यातच एका एन्काऊंटरमध्ये उमर फारूक मारला गेला.पुलवामा हल्ला प्रकरणी काल एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं. त्यात मसूद अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगरची नावांचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख आहे. याशिवाय आरोपपत्रात मोहम्मद उमर फारूक, आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार आणि पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या अन्य दहशतवादी कमांडर्सचीदेखील नावं आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांविरोधात पुरेसे पुरावे असल्याची माहिती एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पुराव्यांमध्ये चॅट, कॉल्स यासारखे पुरावे असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.मसूद अजहरचा भाचा उमर फारूक एप्रिल २०१८ मध्ये जम्मू-सांबा सेक्टरमधील सीमा ओलांडून भारतात आला होता. तो पुलवाम्यात जैशचा कमांडर होता. एनआयएतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमर फारूक आणि त्याच्या सहकाऱ्यांनीच सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याची योजना आखली होती. या हल्ल्यात ४० जवानांना वीरमरण आलं. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक