Terrorists use new app to provoke Kashmiri youth | काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर

काश्मीरी युवकांना भडकविण्यासाठी अतिरेक्यांकडून नव्या ॲपचा वापर

श्रीनगर : व्हॉट्‌सॲपसारख्या मॅसेजिंग ॲपकडून खासगीत्वाबाबत होत असलेल्या चर्चेमध्येच पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना व त्यांचे म्होरके युवकांना भडकविण्यासाठी आता नव्या ॲपचा वापर करीत आहेत. यात तुर्की कंपनीने विकसित केलेल्या ॲपचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

चकमकीनंतर मिळविलेले पुरावे, शरणागती पत्करणाऱ्या अतिरेक्यांनी पाकिस्तानस्थित अतिरेकी संघटनांकडून कट्टरपंथी बनविण्याच्या प्रक्रियेची दिलेली माहिती, यावरून तीन नवीन ॲप प्रकाशात आले आहेत. तथापि, सुरक्षेच्या कारणास्तव या ॲपची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, यातील एक ॲप अमेरिकी कंपनीचे आहे, दुसरे युरोपच्या कंपनीचे तर तिसरे नवीन ॲप तुर्कीच्या कंपनीने विकसित केले आहे. अतिरेकी संघटनांचे म्होरके व काश्मीर खोऱ्यातील त्यांचे संभाव्य सदस्य सतत याचा वापर करीत आहेत.
नवीन ॲप इंटरनेटची गती कमी असली तरी टूजी कनेक्शन असल्यावरही काम करते. विशेष म्हणजे सरकारने ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर येथील इंटरनेट सेवा स्थगित केली होती व सुमारे एक वर्षानंतर टूजी सेवा बहाल केली होती.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंटरनेट खंडित झाल्यानंतर अतिरेकी गटांकडून व्हॉट्सॲप व फेसबुक मॅसेंजरचा वापर जवळपास बंदच झाला होता, परंतु नंतर कळाले की, ते नवीन ॲपचा वापर करीत आहेत व हे ॲप वर्ल्ड वाईड वेबवर मोफत उपलब्ध आहे.

आरएसए अमेरिकी नेटवर्क सुरक्षा व प्रमाणीकरण कंपनी असून, तिची स्थापना १९८२मध्ये केली होती. आरएसएचा संपूर्ण जगभरात वापर कूट प्रणालीच्या आधारावर होत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की,  ॲपमध्ये फोन नंबर किंवा ई-मेल पत्त्याची गरज नाही. त्यामुळे याच्या वापरकर्त्याची ओळख पूर्णपणे गोपनीय राहते. 

नवीन ॲपच्या तंत्रज्ञानाची माहिती 
नवीन ॲपच्या तंत्रज्ञानाची माहिती २०१९मध्ये उघड झाली. तेव्हा अमेरिकेला पुलवामा हल्ल्यातील जैशच्या आत्मघाती हल्लेखोराकडून वापरल्या गेलेल्या व्हर्चुअल सीमच्या सेवा प्रदात्याची माहिती मागण्यात आली होती.  तथापि, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) व अन्य सुरक्षा संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार, ४० व्हर्चुअल सीमचा वापर पुलवामा हल्ल्यासाठी करण्यात आला होता. याचबरोबर काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी अशा ॲपचा वापर केला जात आहे, हेही उघड झाले. या तंत्रज्ञानात संगणक टेलिफोन नंबर जनरेट करतो. त्याच्या आधारावर यूजर आपल्या स्मार्टफोनमध्ये ॲप डाऊनलोड करू शकतो.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Terrorists use new app to provoke Kashmiri youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.