हंदवाड्यात दहशतवादी अन् जवानांमध्ये चकमक, भारताचे चार जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2019 19:44 IST2019-03-01T18:59:31+5:302019-03-01T19:44:07+5:30
अभिनंदन वर्धमान हे भारतात दाखल होण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरच्या हंडवाड्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केलं आहे.

हंदवाड्यात दहशतवादी अन् जवानांमध्ये चकमक, भारताचे चार जवान शहीद
श्रीनगर- अभिनंदन वर्धमान हे भारतात दाखल होण्यापूर्वीच जम्मू-काश्मीरच्या हंडवाड्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांना लक्ष्य केलं आहे. हंडवाड्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत चार जवान शहीद झाले आहेत.उत्तर काश्मीरच्या कुपवाडातील हंदवाडा सेक्टरमधील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मीडिया रिपोर्टनुसार, सुरक्षा जवानांनी चकमकीनंतर सर्च ऑपरेशन राबवलं होतं. त्याचदरम्यान एका दहशतवाद्यानं अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. त्या गोळीबारात चार जवान शहीद झाले.
Kupwara (J&K) encounter: One CRPF personnel has lost his life and three CRPF personnel injured, firing continues pic.twitter.com/hEZvAA7iX8