Jammu and Kashmir : बारामुल्लात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 14:02 IST2018-08-19T13:47:15+5:302018-08-19T14:02:33+5:30
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे.

Jammu and Kashmir : बारामुल्लात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत बारामूलाच्या कस्तुरी नार येथील नियंत्रण रेषेजवळील दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी आतापर्यंत चार अतिरेक्यांना कंठस्नान घातलं असून अजूनही चकमक सुरू आहे.
Security forces foil infiltration bid in Baramulla, kill one terrorist. Operation in progress. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) August 19, 2018
शनिवारी (18 ऑगस्ट) भारतीय जवानांनी जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरजवळ नियंत्रण रेषा पार करून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय जवानांना शनिवारी संध्याकाळी नियंत्रण रेषेजवळ काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरू केली. त्याचदरम्यान घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.
Jammu & Kashmir: Three terrorists killed near Line of Control in Tangdhar sector, in Kupwara district; More details awaited pic.twitter.com/RTGJ21RKPk
— ANI (@ANI) August 18, 2018