शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षादलाने हाणून पाडला घुसखोरीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 16:30 IST

लष्करी जवान आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईला यश

Jammu Kashmir Terrorist Killed: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी कारवाई सुरूच आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी रविवारी दावा केला की कुपवाडा पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे आणि उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण पूर्ववत करण्यात आले आहे. सीमेजवळ एका दहशतवाद्याला ठार करण्यात आल्याची माहितीही काश्मीर झोन पोलिसांनी दिली.

ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'एका संयुक्त कारवाईत, लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी तंगधार सेक्टरच्या अमरोही भागात नियंत्रण रेषेजवळ एका दहशतवाद्याला निष्क्रिय करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. सर्च ऑपरेशन सुरू आहे. पुढील माहिती लवकरच दिली जाईल.'

सुरक्षा दलांनी घुसखोराला ठार केले

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि कुपवाडा पोलिसांनी नियंत्रण रेषेजवळील तंगधारच्या अमरोही भागात संयुक्तपणे कारवाई सुरू केली. या संयुक्त कारवाई दरम्यान एक दहशतवादी मारला गेला आणि घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.

राजौरीमध्ये कारवाई सुरूच आहे

दरम्यान, राजौरीमध्ये दुसऱ्या दिवशीही दहशतवादविरोधी कारवाई सुरूच आहे. राजौरी जिल्ह्यातील गुंधा-खवास गावात काल चकमक सुरू होताच एक दहशतवादी मारला गेला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, काल चकमक सुरू झाली, त्यादरम्यान एक अज्ञात दहशतवादी मारला गेला होता. ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

2-3 दहशतवादी लपल्याची बातमी होती

डिफेन्स पीआरओ 14 कॉर्प्स लेफ्टनंट कर्नल सुनील बारटवाल यांनी एका निवेदनात सांगितले की, दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती आणि सुरक्षाकडे तोडण्याचा प्रयत्न वारंवार फसला. पलायनाचे सर्व मार्ग रोखण्यासाठी अधिक सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले असून दहशतवाद्यांना निष्प्रभ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणाले की, भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे विशेष दल आणले गेले आहे तर रात्री-सक्षम क्वाडकॉप्टर, मानवरहित हवाई वाहने आणि स्निफर डॉग देखील सेवेत आणले गेले आहेत.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राजौरीतील पोलिसांनी लोकांना चकमकीच्या ठिकाणापासून दूर राहण्यास सांगितले आहे. सर्वांच्या माहितीसाठी असे की, गुंधा, खवास गावातही कारवाई सुरू आहे. लोकांना या भागात न जाण्याचा आणि या भागापासून किमान दोन किलोमीटर दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादPoliceपोलिस