दहशतवादी परत जा; प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासमोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 09:37 AM2019-12-26T09:37:25+5:302019-12-26T09:40:23+5:30

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत

Terrorist Go Back Students Protest Against bjp mp Pragya Thakur | दहशतवादी परत जा; प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासमोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

दहशतवादी परत जा; प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासमोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

Next

भोपाळ: विमानातील प्रवाशांसोबत हुज्जत घातल्यानंतर भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काल ठाकूर यांनी भोपाळमधील एका विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी ठाकूर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी 'दहशतवादी परत जा' अशा घोषणा दिल्यानं वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विद्यापीठात हा प्रकार घडला. 

विद्यापीठात शिकणाऱ्या श्रेया पांडे आणि मनू शर्मा या दोन विद्यार्थिनी आंदोलन करत होत्या. हजेरी कमी असल्यानं केलेल्या निलंबनाविरोधात त्यांचं आंदोलन सुरू होतं. त्यांच्या भेटीसाठी ठाकूर विद्यापीठात पोहोचताच काही विद्यार्थीदेखील तिथे पोहोचले. यातले बहुतांश विद्यार्थी नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडियाचे (एनएसयूआय) कार्यकर्ते होते. त्यांनी ठाकूर यांना घेराव घालत दहशतवादी परत जा, अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एनएसयूआयचे कार्यकर्ते प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. यानंतर काही भाजपा समर्थकदेखील तिथे पोहोचले. त्यांनी ठाकूर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वातावरणातला तणाव निवळला. 
 

Web Title: Terrorist Go Back Students Protest Against bjp mp Pragya Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.