शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; एकाला अटक, दिल्लीत हायअलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:23 IST

26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात आणि अक्षरधान मंदिरावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचे माहितीमधून समोर आलं आहे.

नवी दिल्ली - 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी राजधानी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्याला पोलिसांनी काल रात्री मथुरा जवळील भोपाळ शताब्दीमधून अटक केली. 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी केली. त्यावेळी आणखी दोन जण दिल्लीमध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली.  मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये छापा मारला. पण त्यापूर्वीच दोन संशयितांनी पलायन केलं होतं. 26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात आणि अक्षरधान मंदिरावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचे माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळं सध्या दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबी दोन्ही फरार संशयतीचा शोध घेत आहेत.  राजधानी नवी दिल्लीमध्ये संशयित दहशतवादी लपून बसल्यामुळं सुरक्षा यंत्रणा सध्या सर्वस्वी त्यांचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे.  

१० देशाचे राष्ट्रप्रमुख राहणार उपस्थित

या प्रजासत्ताक दिनी आसियान देशांच्या सर्व राष्ट्र प्रमुखांना आमंत्रित करणार असल्याची माहित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून दिली होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की प्रजासत्ताकदिनी एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याची प्रथा जुनीच असून, यंदा प्रथमच आपण आसियान गटातील तब्बल १० देशाच्या राष्ट्र प्रमुखांना प्रजासत्ताक दिनासाठी बोलवणार आहोत. दरम्यान दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना किंवा आसियान या गटात इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, म्यानमार, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, कंबोडिया आणि लाओस या 10 देशांचा समावेश होतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTerror Attackदहशतवादी हल्ला