श्रीनगर - एकीकडे देश कोरोना विषाणूचा सामना करत असताना दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना उत आला आहे. आज काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला असून, या हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी सोपोर येथे सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त गस्ती पथकावर हा हल्ला घडवून आणला.
काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद, तीन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 18:46 IST