शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 16:57 IST

Terrorist attack : बाजारात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजही तपासले जात आहेत.

ठळक मुद्देया हल्ल्यात पोलिस एएसआय, सीआरपीएफ जवान यांच्यासह 6 जण जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दुपारी 1.15 च्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला केला.

श्रीनगर - गेल्या एका आठवड्यात खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षा दलांना लक्ष्य करुन दहशतवादी तिथे उपस्थित सामान्य नागरिकांना लक्ष्य करणं सोडत नाही आहेत. जिल्हा बडगाममध्ये गेल्या चोवीस तासात दहशतवाद्यांनी आज दुसरा ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात पोलिस एएसआय, सीआरपीएफ जवान यांच्यासह 6 जण जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे, जेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर लवकरच सुरक्षा दलाने परिसर घेरला असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. बाजारात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजही तपासले जात आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दुपारी 1.15 च्या सुमारास हा ग्रेनेड हल्ला केला. बडगाममधील पाखरपोरा बाजारात, जेव्हा सर्व लोक आवश्यक वस्तू खरेदी करीत होते, तेव्हा काही संशयित अतिरेकी लोक तेथे आले आणि बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना लक्ष्य करत त्यांच्यावर ग्रेनेड फेकले. पोलीस आणि सीआरपीएफ जवानांवर पडण्याऐवजी सुरक्षा कर्मचार्‍यांच्या काही अंतरावर ग्रेनेडचा स्फोट झाला. परंतु जम्मू-काश्मीर पोलिसांचे एएसआय गुलाम रसूल उर्फ दिलावर आणि सीआरपीएफचे हवालदार संतोष कुमार गंभीर जखमी झाले. याखेरीज बाजारपेठेत खरेदी करणारे चार स्थानिक नागरिकही जखमी झाले असून शफीक अहमद नाझर, इरफान वानी आणि इतर दोन जखमींमध्ये महिलांचा समावेश आहे. सुरक्षा दल आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सर्व जखमींना त्वरित उपजिल्हा रुग्णालय पाखरपोरा येथे दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सीआरपीएफ जवानांच्या गुडघ्याला जखम झाली आहे. प्रथमोपचारानंतर जखमी स्थानिक नागरिकांना एसएमएचएस रुग्णालयात दाखल केले. त्यातील दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. 

Coronavirus : जे जे मार्ग पोलीस ठाण्याला कोरोनाचा विळखा, १२ पोलिसांना लागण 

 

गॅंगरेपचं प्लॅनिंग करत होती शाळकरी मुलं, इंस्टाग्राम चॅट झाले लीक 

 

हॅलो, मी सचिवालयातून बोलतोय! फोन उचलताच नगरसेवकांच्या खात्यातून दीड लाख लंपास

हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस, सैन्य आणि सीआरपीएफच्या जवानांनी परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर बाजारात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेजही तपासले जात आहेत. जिल्हा बडगाममधील हा दुसरा ग्रेनेड हल्ला आहे. यापूर्वी जिल्हा बडगाममधील वागुरा पॉवर ग्रिड स्थानकात तैनात सीआयएसएफ जवानांवर काही दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले होते. या हल्ल्यात एक सैनिकही जखमी झाला आहे. जखमी जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. या युवकाला किरकोळ जखम झाली होती आणि आता त्याची प्रकृती अधिक चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.काश्मीर विभागाबद्दल सांगायचे तर गेल्या तीन दिवसातील ही चौथी दहशतवादी घटना आहे. गेल्या रविवारी पुलवामाच्या छंजमुला गावात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमधील चकमकीत राष्ट्रीय रायफलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, नाईक राजेश, लान्स नाईक दिनेश शहीद आणि जम्मू-काश्मीरचे पोलिस उपनिरीक्षक सगीर अहमद पठाण शहीद झाले होते. मात्र, सुरक्षा दलानेही या हल्ल्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSoldierसैनिक