जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भीषण अपघात! लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, २ जवान शहीद, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:51 IST2025-01-04T16:34:32+5:302025-01-04T16:51:49+5:30

शनिवारी भारतीय लष्कराचे एक वाहन दरीत कोसळला, यात दोन जवान शहीद. या अपघातात अनेक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे.

Terrible accident in Jammu and Kashmir's Bandipora! Army truck falls into a valley, 2 soldiers killed, many injured | जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भीषण अपघात! लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, २ जवान शहीद, अनेक जखमी

जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भीषण अपघात! लष्कराचा ट्रक दरीत कोसळला, २ जवान शहीद, अनेक जखमी

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे शनिवारी ०४ जानेवारी रोजी भारतीय लष्कराचे एक वाहन दरीत कोसळले, यामध्ये दोन सैनिक ठार झाले. या अपघातात तीन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुनाचे अनेक जवान घटनास्थळी बचाव कार्यात करत आहेत.

धक्कादायक! आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला, काही पोलीस जखमी

उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरले आणि दरीत कोसळले.  या अपघातात दहशतवादी अँगल असल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. मात्र, सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याआधीही २४ डिसेंबर २०२४ रोजी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील बलनोई सेक्टरमध्ये मोठा रस्ता अपघात झाला होता. या अपघातात लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले. पूंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटी दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात पाच जवान शहीद झाले.

Web Title: Terrible accident in Jammu and Kashmir's Bandipora! Army truck falls into a valley, 2 soldiers killed, many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.