Terrible accident in Doda, Jammu; Sixteen people were killed | जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये भीषण अपघात; 16 जण ठार
जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये भीषण अपघात; 16 जण ठार

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये एक टेम्पो टॅक्सी खोल दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात 16 जण ठार झाले आहेत. 


जखमींची संख्याही मोठी आहे. जखमीना नजिकच्या सरकारी, खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. डोडा जिल्ह्यातील खिलैनीमध्ये मंगळवारी घाटातून एक टेम्पो टॅक्सी दोन हजार फूट खोल दरीमध्ये कोसळली. यामध्ये 16 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींची संख्या समजू शकलेली नाही. 


तर चार ते पाच लोक जखमी असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. या जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. लोकांनी कळविल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले असून बचाव कार्य सुरू केले. 

Web Title: Terrible accident in Doda, Jammu; Sixteen people were killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.