शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! कारमधून भावाला ढकललं, सीट बेल्टमध्ये अडकल्यानंतरही २५ किमी फरफटलं, तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:50 IST

तरुणासोबत घडलेल्या क्रूरपणामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी काही तासांत आरोपींना अटक केली आहे.

भोपाळ :मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाद झाल्याने चुलत भावानेच धावत्या कारमधून तरुणाला ढकललं आणि तो तरुण सीट बेल्टमध्ये अडकल्यानंतर २५ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. भोपाळ  हायवेवरील या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संदीप नकवाल (वय ३५ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील सिक्योरिटी लाइनमधील रहिवासी असलेला संदीप नकवाल हा आपल्या एका नातेवाईकाच्या निधनानंतर तेराव्याच्या विधीसाठी नसिराबाद इथं गेला होता. तिथं संदीपचा चुलत भाऊ संजीव नकवाल हादेखील आला होता. विधी आटोपल्यानंतर संदीप आणि संजीव हे मित्र राजेश चढार याच्या कारमधून घरी परतण्यासाठी निघाले. मात्र वाटेत दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर संजीवने धावत्या कारमधूनच संदीपला बाहेर ढकललं. त्यानंतर संदीप कारच्या सीट बेल्टला अडकला गेला. मात्र त्यानंतरही राजेश आणि संजीव कार न थांबवता सुसाट निघाले. तब्बल २५ किलोमीटर अंतरापर्यंत त्यांनी संदीपला फरफटत नेलं. 

हे भयंकर दृष्य पाहिल्यानंतर हायवेवरील एका वाटसरूने पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाठलाग करत कार थांबवली आणि आरोपी संजीव आणि राजेश चढार यांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्याविरोधात भा.दं.वि.च्या ३०२ कलमांतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी