जम्मूत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा घरोबा संपुष्टात
By Admin | Updated: July 20, 2014 18:42 IST2014-07-20T15:00:27+5:302014-07-20T18:42:10+5:30
गेल्या पाच वर्षांपासून जम्मू - काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा घरोबा आता संपुष्टात आला आहे.

जम्मूत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा घरोबा संपुष्टात
ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. २०- गेल्या पाच वर्षांपासून जम्मू - काश्मीरमध्ये सुरु असलेला नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा घरोबा आता संपुष्टात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये येत्या वर्षाअखेर होणारी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याची घोषणाही दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे.
८७ आमदार असलेल्या जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणुकीच्या चालू वर्षाच्या अखेरीस होणार आहे. सध्या जम्मूत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांची युती आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली. काँग्रेसचे नेते अंबिका सोनी यांनी काँग्रेस सर्व जागांवर लढवणार अशी घोषणा केली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे युती संपुष्टात आल्याची घोषणा केली. '१० दिवसांपूर्वी मी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीची भेट घेऊन आमच्या निर्णयाची माहिती दिली होती. त्यांनी दिलेल्या सहका-याबद्दल त्यांचे आभारही मानले असे अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.