सैन्यमाघारीशिवाय तणाव निवळणार नाही; लष्करप्रमुखांचा यांचा चीनला स्पष्‍ट संदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:40 AM2021-05-30T09:40:22+5:302021-05-30T09:40:48+5:30

जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थ‍िती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे.

Tensions will not go away without a military coup Army chief's clear message to China | सैन्यमाघारीशिवाय तणाव निवळणार नाही; लष्करप्रमुखांचा यांचा चीनला स्पष्‍ट संदेश

सैन्यमाघारीशिवाय तणाव निवळणार नाही; लष्करप्रमुखांचा यांचा चीनला स्पष्‍ट संदेश

Next

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये सर्व संघर्षप्रवण ठिकाणांवरून संपूर्ण सैन्य माघारी केल्याशिवाय तणाव कमी होऊ शकत नाही, असा स्पष्ट संदेश  लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी चीनला दिला आहे. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय सेना पूर्णपणे सज्ज असल्याचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. 

जनरल मनोज नरवणे यांनी एका मुलाखतीमध्ये पूर्व लडाखबाबत भारताची स्थ‍िती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, सद्यस्थितीत एकतर्फी बदल करण्यात येणार नाही, ही भारतीय सेनेची भूमिका स्पष्ट भूमिका आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये भीषण चकमक उडाली होती. 

राखीव सैनिक सज्ज
भारतीय सैन्याची सद्य:स्थितीत उंचावरील सर्व महत्त्वपूर्ण तळांवर मजबूत पकड आहे. कोणत्याही विपरीत परिस्थितीत प्रत्युत्तर देण्यासाठी पुरेशा प्रमाणात राखीव सैनिक सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहितीही नरवणे यांनी दिली. 
पँगाँग तलावाच्या परिसरातून सैन्यकपातीबाबत करार केल्यानंतर चिनी सैन्याने उल्लंघन करण्यात आलेले नाही. त्यामुळे अप्रिय घटना घडण्याची शक्यता कमी असलचेही लष्करप्रमुखांनी सांगितले. चीनकडून अरुणाचल प्रदेश आणि भूतानच्या सीमेलगत गावे वसविण्यात येत आहेत. तसेच या भागात पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. 

Web Title: Tensions will not go away without a military coup Army chief's clear message to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.