शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 00:18 IST

टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे...

पैगंबर मोहम्मदांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात न्यायालयाने आमदार टी. राजा सिंह यांना इशारा देत जामीन दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने त्यांना सर्वप्रथम 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला होता. मात्र नंतर, न्यायालयाने रिमांडचा आदेश मागे घेत त्यांना जामीन दिला. पोलिसांनी टी. राजा सिंह यांना हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात हजर केले होते.

तत्पूर्वी भाजपने टी. राजा यांना भाजपमधून निलंबित केले आहे. एवढेच नाही, तर पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत 10 दिवसांत उत्तर द्यायला सांगितले आहे. पैगंबर मोहम्मदांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी त्यांना मंगळवारी सकाळी अटक केली होती. टी. राजा सिंह हे हैदराबादमधील गोशामहल मतदार संघाचे आमदा आहेत.

टी. राजा सिंह यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 153ए (विविध समूहांमध्ये शत्रुत वाढविणे), 295 (धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने पूजा स्थळाचा अपमान करणे अथवा ती अपवित्र करणे.) आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली होती. 

यापूर्वीही अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य -टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या वर्षी जूनमध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. टी राजा सिंह यांच्याविरोधात हैदराबादचे रहिवासी मोहम्मद अली यांनी तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, टी राजा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये राजा सिंह अल्पसंख्याक समुदायाबद्दल अपमानास्पद बोलतांना दिसत होते. याप्रकरणी कांचनबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

टॅग्स :hyderabad caseहैदराबाद प्रकरणBJPभाजपाMLAआमदार