भाजपा नेत्याच्या हत्येने उत्तर प्रदेशात तणाव

By Admin | Updated: June 9, 2014 03:25 IST2014-06-09T03:25:34+5:302014-06-09T03:25:34+5:30

भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील दादरी नगर पंचायतच्या अध्यक्ष गीता पंडित यांचे पती विजय पंडित यांची शनिवारी रात्री चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली

Tension in Uttar Pradesh killing of BJP leader | भाजपा नेत्याच्या हत्येने उत्तर प्रदेशात तणाव

भाजपा नेत्याच्या हत्येने उत्तर प्रदेशात तणाव

ग्रेटर नोएडा : भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशातील दादरी नगर पंचायतच्या अध्यक्ष गीता पंडित यांचे पती विजय पंडित यांची शनिवारी रात्री चार अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. या हत्याकांडानंतर पंडित यांचे समर्थक प्रक्षुब्ध झाले आणि त्यांनी दादरी परिसरात प्रचंड जाळपोळ आणि दगडफेक केली. पंडित यांच्या हत्येच्या संदर्भात रविवारी चार संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गौतम बुद्धनगर जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
पंडित यांच्या समर्थकांनी १६ वाहनांना आग लावली आणि पोलीस पथकावर दगडफेक केली. या संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी लोकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
रविवारी सायंकाळी पंडित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडित यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळली होती.
पंडित यांना सतत धमकीचे फोन येत होते आणि याबाबत
पोलिसात तक्रारही दाखल केली
होती. परंतु पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप पंडित यांचे बंधू मुकेश यांनी केला. विजय पंडित यांचे जीटी रोडवर किराणा दुकान आहे. या हत्येच्या निषेधार्थ रविवारी व्यापाऱ्यांनी बंद पाळला. (वृत्तसंस्था)

Web Title: Tension in Uttar Pradesh killing of BJP leader