शुभमच्या मृत्यूनंतर मेरठमध्ये तणाव

By Admin | Updated: May 14, 2014 00:15 IST2014-05-13T19:00:43+5:302014-05-14T00:15:01+5:30

शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या भागात झालेल्या हिंसाचारात गोळी लागून जखमी झालेल्या शुभम् रस्तोगी या १८ वर्षांच्या मुलाच्या निधनाने येथील वातावरणात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

Tension in Meerut after Shubham's death | शुभमच्या मृत्यूनंतर मेरठमध्ये तणाव

शुभमच्या मृत्यूनंतर मेरठमध्ये तणाव

मेरठ : शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या भागात झालेल्या हिंसाचारात गोळी लागून जखमी झालेल्या शुभम् रस्तोगी या १८ वर्षांच्या मुलाच्या निधनाने येथील वातावरणात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा शुभम्वर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबीय, अनेक नागरिक, पोलीस व प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुभम्च्या निधनानंतर शहराच्या जुन्या भागात प्रतिक्रियात्मक किरकोळ घटना घडल्या. त्यावर पोलिसांनी तात्काळ नियंत्रण मिळविले. मेरठ शहरातील प्रमुख बाजार आज चौथ्या दिवशीही बंद होते. शुभम्च्या निधनाने शहरातील तणाव अधिक वाढला असून, तो कोतवाली जवळच्या परिसरात अधिक प्रमाणात आहे. या चकमकीत अन्य सहा जण जखमी झाले होते. पोलिसांनी या घटनेत सामील असलेल्या एक डझन लोकांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Tension in Meerut after Shubham's death