शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला देणार दिलासा; GSPचा दर्जा पुन्हा मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:14 PM

विशेष म्हणजे या तणावाच्या काळातही अमेरिका भारताशी असलेले व्यावसायिक संबंध वाढवण्याचा विचार करत आहे.

नवी दिल्लीः भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या सीमेवर झालेल्या चकमकीनंतर उभय देशांतील संबंधात कटुता आलेली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधही बिघडले आहेत. विशेष म्हणजे या तणावाच्या काळातही अमेरिका भारताशी असलेले व्यावसायिक संबंध वाढवण्याचा विचार करत आहे. अमेरिकन सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, 'जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सी' (जीएसपी) अंतर्गत भारताचा पुन्हा समावेश केला जाऊ शकतो.ते म्हणाले की, अमेरिका सध्या यासंदर्भात भारताशी बोलणी करत आहे. आम्ही अद्याप तसं केलेलं नाही, पण आता आम्ही याबद्दल चर्चा करत आहोत. आम्हाला भारताकडून योग्य प्रतिसाद आणि प्रस्ताव मिळाल्यास आम्ही तो दर्जा भारताला परत देऊ शकतो, असं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लीट्झर यांनी सिनेटच्या वित्त समितीच्या सदस्यांना सांगितले.जीएसपी म्हणजे नेमकं काय?गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींच्या दौ-यापूर्वी अमेरिकेच्या 44 प्रभावी खासदारांनी ट्रम्प प्रशासनाला भारताला जीएसपी व्यापार कार्यक्रमात ठेवण्याची मागणी केली होती. ट्रम्प प्रशासनाने गेल्या वर्षी जूनमध्ये भारताला 'जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सी' (जीएसपी)मधून वगळले होते. जीएसपी अंतर्गत भारताने अमेरिकेबरोबर व्यापाराला प्राधान्य दिले होते. जीएसपी हा अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापार कार्यक्रम आहे, ज्याच्या लाभार्थी देशांना फायदा होतो. अशा देशांना अमेरिकेच्या हजारो उत्पादनांच्या निर्यातीपासून सूट देण्यात येत असते. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिट्झर यांना लिहिलेल्या पत्रात खासदार म्हणाले की, घाई करण्याऐवजी आम्हाला अमेरिकन उद्योगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी लागेल आणि छोट्या छोट्या अडचणी या मार्गाने येऊ नयेत, याचाही विचार करावा लागेल. भारतातील कथित जास्त आयात शुल्कानं अमेरिका होता अस्वस्थविशेष म्हणजे अमेरिकेच्या सिनेटर मारिया कॅंटवेल यांनी आपल्या अमेरिकेतून भारतात जाणा-या सफरचंदांवर ७० टक्के आयात शुल्क लादल्याबद्दल निराशा व्यक्त केली होती. अमेरिकन सरकारने भारताकडून आकारलं जाणारं असं भरमसाट शुल्क कमी करण्यासाठी अमेरिकेनं काय केले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. यावर लेझर म्हणाले, 'आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. अमेरिका सध्या भारताशी मोठ्या व्यापार चर्चेत गुंतलेली आहे. आमची भारताशी मोठी चर्चा सुरू आहे. मला खात्री आहे की, आपण हे समजून घ्याल की आम्ही मुक्त व्यापार कराराकडे वाटचाल करीत आहोत. जर असे काही झाले तर ते आशियातही होईल. मोन्टानाचे सिनेटचे सदस्य स्टीव्ह डायन्स यांनी भारताकडून डाळींवर कथित आकारला जाणारा जास्त दराचा मुद्दा उपस्थित केला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प