शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

दहा महसूल अधिकारी मनी लाँड्रिंगमध्ये दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 5:16 AM

उत्तर कोलकातामधील एका घाणेरड्या ठिकाणांहून ९८ बनावट कंपन्या चालविणाऱ्या हिशेबनिसाचा पर्दाफाश झाल्याने खळबजनक माहिती उजेडात आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर कोलकातामधील एका घाणेरड्या ठिकाणांहून ९८ बनावट कंपन्या चालविणाऱ्या हिशेबनिसाचा पर्दाफाश झाल्याने खळबजनक माहिती उजेडात आली आहे. भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) काही शक्तिशाली अधिकाऱ्यांना कथित दलाली मिळाल्याची जंत्रीच हाती लागली आहे. फारसा चर्चेत नसलेला अकाऊंटंट गोविंद अग्रवालच्या कार्यालयावर घालण्यात आलेल्या धाडीत हाती लागलेल्या आक्षेपार्ह दस्तावेजांनुसार हा प्रकार जैन हवाला डायरीइतकाच खळबळजनक असू शकतो.अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) चौकशीनुसार गोविंद अग्रवालची ठकबाजी आणि त्याच्या बनावट कंपन्यांशी संबंधित एकमेकांशी घनिष्ट असलेल्या नागरी सेवेतील अधिकाºयांच्या वर्तुळाशी भारतीय महसूल सेवेतील दहा अधिकाºयांचा थेट संबंध आहे. गोविंद अग्रवालच्या बनावट कंपन्यांत त्यांनी भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा असण्याची शक्यता असावी. या गोरखधंद्यातसहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाºयांच्या यादीत माजी केंद्रीय दक्षता आयुक्त, सीबीडीटीचे सदस्य, माजी महासंचालकांचा समावेशआहे.ईडीने २३ आॅक्टोबर रोजी एक आयआरएस अधिकारी आणि इतरांविरुद्ध मनी लाँड्रिंगप्रकरणी कोलकात्यात काही ठिकाणांवर धाडी घातल्या होत्या. आयआरएस अधिकारी नीरज सिंह यांच्याविरुद्ध चौकशीच्या अनुषंगाने एचएम दिवाण ज्वेलर्स आणि त्याच्या दोन प्रवर्तकांचे निवासस्थान, शोरूमवर आणि अन्य ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. या धाडीत ईडीने सोन्याच्या अवैध विक्रीसह अनेक आक्षेपार्ह दस्तावेज आणि पंचतारांकित हॉटेल्सची बिले आदी जप्त केले होते.गोविंद अग्रवालचे नागरी सेवेतील अधिकाºयांंशी जवळीक असल्याने त्याने कोलकाता येथील आंतरराष्टÑीय विमानतळावर परमिटचा वापर करून प्रतिबंधित भागात शंभरपेक्षा अधिक वेळा प्रवेश केला होता. त्यावेळीनीरज सिंह हे हवाई गुप्तचर विभागाचे अतिरिक्त संचालक (चौकशी) होते. (वृत्तसंस्था)