शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मंदिराची जमीन हडपण्यासाठी देव मरण पावल्याची केली नोंद, उत्तर प्रदेशातील अजब घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 06:36 IST

Temple Land Grabbed by Declaring God ‘Dead’ : या राज्यातील मोहनलालगंज परिसरातील कुशमौरा हलुवापूर या गावामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील एका गावामध्ये कृष्ण व राम यांच्या एकत्रित मंदिराची जमीन हडपण्यासाठी या देवताच मरण पावल्याचे फेरफार केलेल्या कागदपत्रांत दाखविले. हा प्रकार उजेडात येताच खळबळ उडाली आहे.या राज्यातील मोहनलालगंज परिसरातील कुशमौरा हलुवापूर या गावामध्ये हा अजब प्रकार घडला आहे. हे मंदिर १०० वर्षांहून अधिक जुने आहे. या मंदिराची मालकीची ७३०० चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन आहे. हे मंदिर कृष्ण-राम ट्रस्टतर्फे चालविण्यात येत असल्याचे व राम-कृष्ण या देवतांचे वडील म्हणून गयाप्रसाद या व्यक्तीचे नाव कागदपत्रांत नमूद करण्यात आले होते.१९८७ साली या मंदिराच्या मालकीच्या जमिनीच्या कागदपत्रांत काही फेरफार करण्यात आले. त्यानुसार कृष्ण-राम या देवता मरण पावल्याचे दाखवून ट्रस्टची ही सारी जमीन गयाप्रसाद यांच्या नावावर करण्यात आली होती. १९९१ साली गयाप्रसाद मरण पावले. त्यानंतर कृष्ण-राम ट्रस्टची सारी सूत्रे त्यांचे भाऊ रामनाथ व हरिद्वार यांच्याकडे गेली.  आता हे स्पष्ट होत आहे की, जमिनीचे अनेक भाग करून फसवेगिरी केली गेली आहे. उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी म्हटले की, चौकशीतून हे उघड झाले की, कोणी तरी बनावट कागदपत्रे ज्याने ट्रस्टची मूळात नोंद केली त्याच्या नावाने केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश शर्मा यांनी नुकतेच उप विभागीय दंडाधिकारी प्रफुल्ल त्रिपाठी यांना दिले आहेत. 

२५ वर्षांनंतर प्रकरण उजेडातकृष्ण-राम मंदिराचे मूळ विश्वस्त सुशीलकुमार त्रिपाठी यांनी २०१६ साली नायब तहसीलदारांकडे केलेल्या तक्रारीमुळे २५ वर्षांपूर्वीचे हे अजब प्रकरण आता उजेडात आले आहे. या प्रकरणाची कागदपत्रे चौकशीसाठी नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी व उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही मागवून घेतली; पण त्यातून अद्याप काहीही निष्पन्न झाले नाही.

टॅग्स :TempleमंदिरUttar Pradeshउत्तर प्रदेश