देणगीतूनच साकारतेय मंदिर
By admin | Updated: June 17, 2015 01:33 IST
देणगीतूनच साकारतेय मंदिर
देणगीतूनच साकारतेय मंदिर
देणगीतूनच साकारतेय मंदिर संजय कुलकर्णीराजुरेश्वर, राजूर मराठवाड्यात भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणारे जालना जिल्ह्यातील राजूर (ता. भोकरदन) येथील राजुरेश्वर गणपती मंदिराचे बांधकाम गेल्या ३० वर्षांपासून सुरू आहे. अंगारिका चतुर्थीला या ठिकाणी लाखो भाविक येतात. भारतात गणपतीची जागृत व जाज्वल्य अशी २१ सिद्ध स्थाने आहेत. त्यात राजूरच्या महागणपतीची नोंद आहे. महाराष्ट्रात गणपतीची जी साडेतीन पीठे आहेत, त्यात राजूर हे पूर्ण पीठ व नाभिस्थान आहे. राजूर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन २६ सप्टेंबर १९८५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी नानासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले होते. भाविकांच्या मदतीतून, देणगीतूनच या मंदिराचे संपूर्ण काम व्हावे, असा निर्णय त्यावेळी विश्वस्तांनी घेतला होता. मंदिरावर प्रशासकीय प्रमुख म्हणून भोकरदनचे तहसीलदार आहेत. दरमहा संकष्ट चतुर्थी, सहा महिन्यांनी येणारी अंगारिका चतुर्थी, तसेच भाविकांकडून देणगीच्या स्वरूपात दरवर्षी ८५ लाखापर्यंत रोख देणगी प्राप्त होते. मंदिराचे वार्षिक उत्पन्न सरासरी ९५ लाखांपर्यंत आहे. गाळे, दुकानांच्या माध्यमातून मंदिरास दरमहा ६० हजार रुपये मिळतात. मंदिराचे बांधकाम जवळपास पूर्ण होत आले असून मंदिराला पांढरेशुभ्र मार्बल बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. परिसरात संस्थान कार्यालय, दर्शन रांग सभागृह ही कामे सुरू आहेत. त्याचबरोबर ४० दुकानांचेही काम सुरू असून जालना रस्त्यावर गाळ्यांच्या कामास लवकर सुरुवात होणार आहे. मंदिरास लिफ्ट बसविण्याचे कामही सुरू असल्याचे विश्वस्त व्यवस्थापक गणेशराव साबळे यांनी सांगितले. संस्थानकडे जमा होणार्या रकमेतून बांधकाम खर्च, कर्मचारी पगार, पुजारी मानधन, विद्युत देयके इत्यादींवर खर्च केला जातो. मंदिराचे ऑडिट दरवर्षी होते. .....मालमत्तामंदिराच्या नावे गट नं. १३९ मध्ये १७ एकर व गट नं. १५४ मध्ये ११ एकर शेती आहे. सोयी-सुविधाभाविकांसाठी मंदिराच्या आवारातच भक्त निवासाची व्यवस्था आहे. पिण्याचे पाणी, उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगेवर मंडप आहे. मोठ्या प्रमाणावर अन्नदान केले जाते. सामाजिक बांधिलकीगरजू व्यक्तींच्या वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत केली जाते. बसस्थानकास संस्थानने ३ एकर जमीन दिलेली आहे. बीएसएनएल कार्यालयासाठी २० गुंठे जमीन दिलेली आहे.