शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

नक्षलवाद्यांच्या आदेशाने मंदिर बंद; 21 वर्षांनंतर उघडले श्रीराम मंदिराचे दरवाजे, ग्रामस्थ खुश...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2024 4:24 PM

पाच दशकांपूर्वी झाली मंदिराची स्थापना केली, पण नक्षलवाद्यांनी बळजबरीने मंदिर बंद केले. आता CRPF जवानांनी मंदिर उघडून केली पूजा.

Ram Mandir: श्रीराम जन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीरामाच्या भव्य मंदिर उभारणीसाठी रामभक्तांना 500 वर्षे वाट पाहावी लागली. त्याचप्रमाणे नक्षलवादाचा फटका बसलेल्या सुकमा जिल्ह्यातील ग्रामस्थदेखील 21 वर्षांपासून तेथील श्रीराम मंदिराचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. नक्षलवाद्यांच्या आदेशामुळे 2003 साली मंदिर बंद करण्यात आले होते. पण, आता दोन दशकानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 74 व्या कोरचा कॅम्प उभारल्यानंतर सैनिकांनी मंदिरात पूजा सुरू केली आहे.      छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील लखापाल आणि केरळपेंडा या नक्षलग्रस्त गावांची ही घटना आहे. गावात सुमारे पाच दशकांपूर्वी श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचा अभिषेक सोहळा झाला. पण नंतर नक्षलवादाच्या वाढत्या उद्रेकामुळे 2003 मध्ये राम मंदिराची पूजा बंद करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या भीतीमुळे दोन दशकांपासून या मंदिराचे दरवाजे उघडण्याची कुणाचीही हिम्मत झाली नाही.

कधी बांधले मंदिर?1970 मध्ये बिहारी महाराजांनी मंदिराची स्थापना केली होती. त्याकाळी मालाची ने-आण करण्यासाठी ना रस्ते होते, ना वाहने उपलब्ध होती. म्हणूनच संपूर्ण गावाने सुमारे 80 किलोमीटरवरुन पायी स्वतःच्या डोक्यावर सिमेंट, दगड, खडी आणि इतर सामान आणले होते. मंदिराच्या स्थापनेत गावातील सर्व लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मंदिराच्या स्थापनेनंतर संपूर्ण परिसर श्रीरामाचे भक्त बनले. 

मोठी जत्रा भरायची, अयोध्येतून संतांचे आगमन व्हायचेग्रामस्थांनी सांगितले की, प्राचीन काळी येथे खूप मोठी जत्रा भरत असे, अयोध्येतून साधू-संतही यायचे. मात्र नक्षलवादी वाढल्याने आणि पूजाअर्चा बंद झाल्याने सर्व गोष्टी पूर्णपणे ठप्प झाल्या. नक्षलवाद्यांच्या दबावामुळे पूजा थांबल्यावर जत्राही थांबली. नंतर नक्षलवाद्यांनी या मंदिराची विटंबना करून कुलूप लावले. गावातील पुजारी मंदिराची पूजा आणि देखभाल करत असत. मात्र नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर पुजारी निघून गेले. नंतर मंदिर परिसरात गवत व झाडे वाढून मंदिराची अवस्था दयनीय झाली.

सीआरपीएफ कॅम्प उभारल्यानंतर सैनिकांनी दरवाजे उघडलेअखेर दोन दशकानंतर सीआरपीएफ जवानांनी नक्षलवाद्यांच्या आदेशानंतर बंद केलेले मंदिराचे दरवाजे उघडले. दरवाजे उघडल्यानंतर ग्रामस्थांसह अधिकारी व जवानांनी मंदिराची स्वच्छता आणि विधीवत पूजाही करण्यात आली. यावेळी गावातील बहुसंख्य स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. या मंदिरात विधीवत पूजा केल्याने ग्रामस्थ खुप खुश आहेत.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरChhattisgarhछत्तीसगडnaxaliteनक्षलवादी