तेल्हारा तालुका रात्रभर अंधारात
By Admin | Updated: June 3, 2014 01:54 IST2014-06-02T22:03:35+5:302014-06-03T01:54:45+5:30
काही भागात रविवार, १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. सोमवार, २ जून रोजीही काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करणे वीज वितरण कं पनीच्या अधिकार्यांना शक्य झाले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात वीज वितरणचा अनागोंदी कारभार सुरू आहे. गत १५ दिवसांपासून शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले असून, ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष दिले नाही, तर जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे दिसत आहे.

तेल्हारा तालुका रात्रभर अंधारात
तेल्हारा: तालुक्यातील काही भागात रविवार, १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या भागातील ग्रामस्थांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. सोमवार, २ जून रोजीही काही भागातील वीज पुरवठा सुरळीत करणे वीज वितरण कं पनीच्या अधिकार्यांना शक्य झाले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात वीज वितरणचा अनागोंदी कारभार सुरू आहे. गत १५ दिवसांपासून शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले असून, ग्रामीण भागातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. संबंधित वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष दिले नाही, तर जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे दिसत आहे.