तेलंगणा राज्य ७ एप्रिल रोजी कोरोनामुक्त होण्याची शक्यता- के. चंद्रशेखर राव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 02:22 AM2020-03-31T02:22:32+5:302020-03-31T06:28:44+5:30

कोरोनातून संपूर्णपणे बऱ्या झालेल्या ११ जणांना सोमवारी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

Telangana state likely to be coronary on April 7: K. Chandrasekhar Rao | तेलंगणा राज्य ७ एप्रिल रोजी कोरोनामुक्त होण्याची शक्यता- के. चंद्रशेखर राव

तेलंगणा राज्य ७ एप्रिल रोजी कोरोनामुक्त होण्याची शक्यता- के. चंद्रशेखर राव

Next

हैदराबाद : नवे रुग्ण न आढळल्यास तेलंगणा ७ एप्रिल पर्यंत कोरोनाच्या साथीपासून मुक्त होण्याची शक्यता आहे, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव यांनी सोमवारी केली. या राज्यामध्ये कोरोनाचे ७० रुग्ण असून त्यातील ११ जण उपचारांनंतर बरे झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत राव म्हणाले, की कोरोनातून संपूर्णपणे बऱ्या झालेल्या ११ जणांना सोमवारी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. विदेशातून तेलंगणामध्ये आलेल्या २५,९३७ लोकांच्या प्रकृतीवर सरकारी यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. या सर्वांचा क्वारंटाईन कालावधी १४ एप्रिल रोजी संपणार आहे.

ते म्हणाले, की कोरोना साथीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडील धान्य सरकार विकत घेणार आहे. त्यासाठी ३,२०० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे. धान्यखरेदीचे पैसे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईनद्वारे थेट जमा केले जातील.

कठोर पालन

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले, की तेलंगणामध्ये बाहेरच्या माणसाला सध्या प्रवेश नाकारला जात आहे. नियमांचे जनतेने पालन केले, तर या साथीवर नक्कीच विजय मिळवू शकतो.

Web Title: Telangana state likely to be coronary on April 7: K. Chandrasekhar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.