शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 17:44 IST

एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून देशातील राजकीय वातावरण तापले आहे. गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच दिल्याचा आरोप गौतम अदानी यांच्यावर करण्यात आला आहे. अमेरिकेतील या वादामुळे अदानी समूह चांगलाच वादात सापडला आहे.  यावरून विरोधक केंद्र सरकारची कोंडी करत आहेत.  तसेच, शेअर बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली.

दरम्यान, गौतम अदानी यांनी तेलंगणा सरकारला १०० कोटी रुपयांची देणगी दिल्याचे भाजपने अलीकडेच म्हटले होते. यावर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सांगितले की, यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी अनेक कंपन्यांनी निधी दिला होता. यामध्ये अदानी समूहानेही १०० कोटी रुपयांची देणगी दिली होती. मात्र, अदानी यांनी दिलेले १०० कोटी रुपये स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच अदानी समूहाचे १०० कोटी रुपये परत केले जातील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेतील आपल्या कंपनीसाठी सौरऊर्जेशी संबंधित प्रकल्प आणि कंत्राट मिळवण्यासाठी गौतम अदानी यांनी भारतीय अधिकाऱ्यांना २१०० कोटी रुपयांची लाच दिली होती. ही गोष्ट त्यांनी त्या अमेरिकन बँकांच्या गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवल्याचा आरोपही आहे. हे कंत्राट मिळवण्यासाठी कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांना पैसे देण्याचे मान्य केले होते, असा दावा अमेरिकन वकिलांनी केला आहे.

या प्रकरणी अमेरिकन कोर्टाने गौतम अदानी यांच्यासह सात जणांविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. गौतम अदानी व्यतिरिक्त अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (एसईसी) बुधवारी त्यांचा पुतण्या सागर अदानी, विनीत जैन तसेच अझूर पॉवरचे सीईओ रणजीत गुप्ता आणि कंपनी सल्लागार रुपेश अग्रवाल यांच्यासह सात जणांचा या प्रकरणात समावेश आहे. मात्र, यााप्रकरणी गौतम अदानी यांच्याबद्दल एसईसी थेट बोलावू शकत नाही. त्यासाठी एसईसीला राजनयिक माध्यमातून नोटीस द्यावी लागेल. एसईसीला परदेशी नागरिकांना थेट बोलावण्याचा अधिकार नाही. 

दरम्यान, अमेरिकेतील वादामुळे अदानी समूह चांगलाच वादात सापडला आहे. भारतात देखील यावरून काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शेअर बाजारात देखील मोठी पडझड पाहायला मिळाली. हे लाच प्रकरणावर वाद निर्माण झाल्यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण देत हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. तर या प्रकारामुळे कंपनीने अमेरकेतील एक गुंतवणुकीचा मोठा करार देखील रद्द केला आहे.

अदानी समूहाचे स्पष्टीकरण काय? अदानी ग्रीन संचालकानविरुद्ध अमेरिकेच्या कोर्टाने आणि अमेरिकन सिक्युरिटीज व एक्स्चेंज कमिशनने गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप निराधार असल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. फिर्यादी पक्षाने आरोप लावले असले तरी देखील ते केवळ आरोप आहेत. जो पर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तोवर प्रतिवादी निर्दोष असतो, अशी स्पष्ट बाजू अदानी समूहाने निवेदन जारी मांडली आहे. या प्रकारे कायदेशीर लढाई लढण्याचे अदानी समूहाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Gautam Adaniगौतम अदानीTelanganaतेलंगणाbusinessव्यवसाय