शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

TRS Vs BJP: TRS आमदारांना 250 कोटींची ऑफर; 'भाजप एजंट' पोलिसांच्या ताब्यात, कोट्यवधीची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 14:15 IST

आमदारपद सोडण्यासाठी टीआरएसच्या आमदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन BJP-TRSचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

TRS Vs BJP: येत्या काही महिन्यात तेलंगणा विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती(TRS) आणि भाजपने यासाठी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान, पोलिसांनी बुधवारी रात्री हैदराबादच्या बाहेरील एका फार्महाऊसमधून मोठी रोकड जप्त केली आहे. ही रोकड सत्ताधारी TRSच्या चार आमदारांना पद सोडण्यासाठी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार आमदारांना एकूण 250 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. पोलिसांनी फार्महाऊसवरील एका कारमधून 15 कोटी रुपये रोख जप्त केली आहे. पैसे ऑफर करणारा भाजप एजंट असल्याचा दावा करण्यात आला असून, तो टीआरएस आमदार रोहित रेड्डी, बी हर्षवर्धन रेड्डी, जी बलराजू आणि रेगा कांथा राव यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.

250 कोटींची ऑफर?सायबराबादचे पोलिस आयुक्त स्टीफन रवींद्र यांनी मीडियाला सांगितले की, टीआरएस आमदारांच्या माहितीवरून पोलिसांनी फार्महाऊसवर छापा टाकला. आमदारांना पोलिसांना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील पक्ष सोडण्याचे आमिष दाखवले जात होते. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एका प्रमुख नेत्याला फार्महाऊसवर झालेल्या गुप्त संभाषणात 100 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यासह प्रत्येक आमदाराला 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर टीआरएसच्या चार आमदारांना मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या घरी नेण्यात आले.

केसीआर सरकारच्या विरोधात षडयंत्र

टीआरएसचे सोशल मीडिया संयोजक एम कृष्णक यांनी ट्विट केले की, केसीआर यांच्या सरकारच्या विरोधात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे हे षड्यंत्र आहे. त्यांनी अटक केलेल्यांची छायाचित्रे केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्यासोबत शेअर केली आहेत. मंत्री आणि टीआरएसचे कार्याध्यक्ष केटी रामाराव यांनीही हे पोस्ट रिट्विट केले आहे. यातच #TelanganaNotForSale Twitter वर ट्रेंड करत आहे. 

भाजपने राजकीय नाटक म्हटले

दरम्यान, भाजपने याला मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे राजकीय नाटक असल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी बुधवारी रात्री पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विकासावर लोक हसत आहेत. गेल्या तीन दिवसांतील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या प्रगती भवनातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संपूर्ण फुटेज जाहीर करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. कथित “राजकीय नाटक” मध्ये संत आणि पुरोहितांना सामील करून “हिंदू धर्म” कलंकित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही भाजप अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांवर केला. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस