शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरानं वैतागलेल्या तरुणानं मोदींना पाठवला 9 पैशांचा धनादेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 17:23 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 पैशांनी कपात करण्यात आली आहे.

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9 पैशांनी कपात करण्यात आली आहे. परंतु तरीही गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्यानं वाढत आहेत. हे दरही रुपयांत नव्हे, तर पैशांत कमी होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर तेलंगणातल्या एका व्यक्तीनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पैशांची कपात होत असल्यानं वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट 9 पैशांचा धनादेश दान स्वरूपात पाठवून दिला आहे. सिरसिला जिल्ह्यातील के. व्ही. चंद्रय्या यांनी प्रजा वाणी यांच्या कार्यक्रमादरम्यान जिल्हा कलेक्टर यांच्या हाती हा धनादेश सोपवला आहे.चंद्रय्या म्हणाले, तुम्ही तेलाच्या किमतीत 9 पैशांची कपात केली आहे. तेलाचे दर कमी झाल्यामुळे मी त्यातील पैसे वाचवले. आता याच पैशांना मी पंतप्रधानांना दान करू इच्छितो. आशा आहे की, या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी होईल. आज पेट्रोलच्या दरात 13 पैसे तर डिझेलच्या दरात 9 पैशांनी कपात करण्यात आली असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पेट्रोलचे दर पैशांत कमी केले जात असल्यानं लोकांमध्ये नाराजी आहे. कर्नाटक निवडणुकीदरम्यान जवळपास 16 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दर जशास तसे ठेवण्यात आले होते. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या सूत्राचं पुनरावलोकन केलं असून, लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे कायमचे दर कमी करण्यासाठी सूत्र ठरवू, असेही त्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा आंध्र प्रदेशातल्या रायलसीमा भागातील एका शेतक-यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या दिवशी 0.68 पैशांचा धनादेश पाठवला होता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPetrolपेट्रोलDieselडिझेल