शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपाकडून दक्षिणेत काँग्रेसला जबर धक्का, या राज्यातील विधान परिषद निवडणुकीत जोरदार मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 15:06 IST

Telangana Legislative Council Elections Result:

काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षाला जबर धक्का बसला आहे. राज्यात विधान परिषदेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने दोन जागांवर विजय मिळवला आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. काँग्रेसने केवळ एका जागेवर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना ती जागा जिंकता आली नाही. राज्यातील तिसरा प्रमुख पक्ष असलेल्या बीआरएसने ही निवडणूक लढवली नव्हती. २०२३ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएस पक्षाची सत्ता उलथवून तेलंगाणामध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन केलं होतं. मात्र त्यानंतर राज्यात भाजपानेही आपला जोरदार विस्तार करण्यात यश मिळवलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने तेलंगाणातमध्ये आठ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर आता विधान परिषदेच्या दोन जागांवर मिळालेल्या विजयाने भाजपाचा आत्मविश्वास वाढणार आहे. तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारसमोर भाजपाच्या रूपात एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

तेलंगाणामधील  मेडक-निजामाबाद-आदिलाबाद-करीमनगर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच वारंगल-खम्मम-नलगोंडा शिक्षक मतदारसंघ अशा विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि एक पदवीधर मतदारसंघात ही निवडणूक झाली होती. यापैकी करीमनगर पदवीधर मतदारसंघात भाजपाने पाठिंबा दिलेल्या चौधरी अंजी रेड्डी यांनी काँग्रेसच्या नरेंद्र रेड्डी यांचा ५ हजार मतांनी पराभव केला. तर भाजपा समर्थित मलका कोमारैया यांनी करीमनगर शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला. तर अपक्ष उमेदवार श्रीपाल रेड्डी पिंगिली यांनी वारंगल-खम्मम-नलगौंडा शिक्षक मतदारसंघातून विजय मिळवला.

भाजपाला मिळालेल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे तेलंगाणामधील प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी म्हणाले की, हा विजय तरुण आणि शिक्षकांचा आहे. त्यांनी काँग्रेसचं अपयशी सरकार आणि त्यांच्या समस्या दूर करण्यात अपयश आल्याने काँग्रेसला नाकारले आहे. काँग्रेसने करीमनगर पदवीधर मतदारसंघातील जागा जिंकण्यासाठी सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांना कामाला लावले होते. खूप खर्च केला. मात्र त्यांना ही जागा वाचवता आली नाही. लोकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या काँग्रेसला या निकालांमधून जनतेने सक्त संदेश दिला आहे. 

तेलंगाणामध्ये मिळालेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदी यांनीही आनंद व्यक्त केला आहे. तसे भाजपाला दिलेल्या पाठिंब्यासाठी राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या आणि जनतेमध्ये जाऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोदींनी कौतुक केलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाTelanganaतेलंगणाcongressकाँग्रेसVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदी