शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

VIDEO: फलकनुमा एक्सप्रेसला भीषण आग, प्रवाशांनी उड्या मारुन वाचवले जीव...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 15:26 IST

तेलंगाणातील याददारी जिल्ह्यात ही घटना घडली, यात ट्रेनचे 3 डब्बे जळून खाक झाले.

Falaknuma Express fire: प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना तेलंगणामध्ये घडली आहे. ही घटना याददारी जिल्ह्यातील पडिगीपल्ली आणि बोम्मईपल्ली भागात घडली. या घटनेत हावडा-सिकंदराबाद फलकनुमा एक्सप्रेस ट्रेनच्या S4, S5, S6 स्लीपर कोच बोगी जळून खाक झाल्या. आग इतकी भीषण आहे की, ज्वाळा दूरवर दिसत होत्या. 

तीन बोगी जळून खाकआग लागली तेव्हा ट्रेन हावडाहून सिकंदराबादच्या दिशेने येत होती. आग लागल्याचे कळताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. माहिती मिळताच तात्काळ ट्रेन थांबवून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उडी मारून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत ट्रेन थांबली होती. काही वेळातच स्थानिक लोकही मदतीसाठी तेथे पोहोचले. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. 

रेल्वेने दिले चौकशीचे आदेश अग्निशमन दलाने घटनास्थळी आग विझवण्याचे काम केले. या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. ही आग कशी लागली, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. सध्या रेल्वेतील प्रवाशांना दुसऱ्या ट्रेनने पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आगीचे कारण शोधण्यासाठी रेल्वेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आग एका डब्यात लागली आणि हळूहळू शेजारच्या दोन्ही डब्यांमध्ये पसरली.  

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेTelanganaतेलंगणाfireआगAccidentअपघात