शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

"पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण...", अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 21:06 IST

Telangana Election 2023 : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

Amit Shah Telangana Visit : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तेलंगणातील सिकंदराबाद येथील इम्पीरियल गार्डन येथे झालेल्या संवादात्मक बैठकीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत देशाची अंतर्गत सुरक्षा अत्यंत बिकट होती. देशात रोज कुठे ना कुठे पाकिस्तानातून दहशतवादी हल्ला होत होता आणि आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान गप्प बसले होते. मात्र मोदींच्या राजवटीत देशाची अंतर्गत सुरक्षा चांगली आहे.

तसेच आजच्या घडीला पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करण्याचा विचारही करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. "काँग्रेस सरकारच्या काळात भारताच्या सीमेत घुसून स्फोट घडवण्याची पाकिस्तानची सवय होती. त्यांनी उरी आणि पुलवामामध्ये कट रचले. पण, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या रूपात चोख प्रत्युत्तर देण्यात आले", अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

२०१४ मध्ये जनतेते देशातील अस्थिरता संपवलीअमित शहा यांनी आणखी सांगितले की, आज जगभर भारताचा डंका आहे. मोदी सरकारच्या काळात आपल्या देशाचा जगभर आदर केला जात आहे. काँग्रेसच्या काळात आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण अस्पष्ट होते, पण आज ते स्पष्ट आहे. २०१४ मध्ये देशातील जनतेने मोठा निर्णय घेऊन अस्थिरतेचे वातावरण संपवले. जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. पक्षाची सत्ता येऊन नऊ वर्षे  झाली असली तरी आज आमचे विरोधक देखील पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाहीत. मोदींच्या कार्याचे कौतुक करताना शहा म्हणाले, "नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ९ वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर पोहोचली. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. याबाबत कोणालाच शंका नाही."

टॅग्स :TelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाहBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस