काँग्रेसने दक्षिणेचे आणखी एक द्वार उघडले! तेलंगणात बीआरएस पिछाडीवर, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 04:01 PM2023-12-03T16:01:56+5:302023-12-03T16:03:47+5:30

तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पिछाडीवर टाकले आहे, यामुळे आता काँग्रेसला दक्षिणेतील कर्नाटकनंतर तेलंगणा या एका राज्यात विजय मिळणार आहे.

Telangana Election 2023 Result Congress opened another door to the south BRS lags behind in Telangana, read more | काँग्रेसने दक्षिणेचे आणखी एक द्वार उघडले! तेलंगणात बीआरएस पिछाडीवर, वाचा सविस्तर

काँग्रेसने दक्षिणेचे आणखी एक द्वार उघडले! तेलंगणात बीआरएस पिछाडीवर, वाचा सविस्तर

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी जाहीर झाले. या निकालात राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पराभूत होताना दिसत आहे. तर ज्या राज्यात काँग्रेस एक्झिट पोलमध्ये विजयी होताना दिसत होती, ते खरे ठरताना दिसत आहे. काँग्रेसने तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची दशकभराची सत्ता उलथून टाकली आहे. काँग्रेस ६६ जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समिती ३७ जागांवर आघाडीवर आहे. भाजप १० जागांवर आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेससाठी हा महत्त्वाचा विजय आहे.

Chhattisgarh Telangana Election 2023 Result Live: रेवंथ रेड्डी तेलंगणचे मुख्यमंत्री?

या विजयाने दक्षिणेत काँग्रेससाठी आणखी एक द्वार उघडले आहे. यामुळे आता काँग्रेसला आंध्रप्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीतही आघाडी घेऊ शकते असं बोलले जात आहे. यामुळे दक्षिणेत काँग्रेस मजबूत होईल. कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशात एक किंवा दोन नंबरला असू शकते.

तेलंगणात काँग्रेस मोठा पक्ष असा बनला

तेलंगणातील काँग्रेसच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे लक्ष 'कल्याणकारी मॉडेल आणि विकास मॉडेल'वर राहिले आणि निवडणूक प्रचारात यावर लक्ष केंद्रीत केले. प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा ४ हजार रुपये, महिलांना २,५०० रुपये, वृद्धांना ४ हजार रुपये पेन्शन आणि शेतकऱ्यांना १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. याशिवाय काँग्रेसच्या निवडणूक प्रचारादरम्यान केसीआर यांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला जात होता. 

 तेलंगणात RRR जादूने काम केले आहे. RRR जादू म्हणजे राहुल गांधी आणि रेवंत रेड्डी. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी तेलंगणामध्ये जवळपास २६ सभा घेतल्या. प्रियांका गांधी यांनीही जोरदार सभा घेतल्या.  

कोण आहेत रेवंत रेड्डी?

रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाला सुरुवात केली. उस्मानिया विद्यापीठातून पदवी घेतलेले रेड्डी त्यावेळी अभाविपशी संबंधित होते. नंतर ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षात सामील झाले. टीडीपीचे उमेदवार म्हणून त्यांनी २००९ साली आंध्र प्रदेशच्या कोडंगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. २०१४ मध्ये ते तेलंगणा विधानसभेत टीडीपीचे सभागृह नेते म्हणून निवडले गेले. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. केसीआर यांनी निवडणुकीच्या एक वर्ष आधीच विधानसभा विसर्जित केली होती आणि निवडणुका घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर, काँग्रेसने त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरीतून तिकीट दिले यामध्ये त्यांना फक्त १० हजार मते मिळाली. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष पद दिले, आता त्यांनी या निवडणुकीत मोठी कामगिरी केली आहे.

Web Title: Telangana Election 2023 Result Congress opened another door to the south BRS lags behind in Telangana, read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.