CoronaVirus News : सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:46 PM2021-05-13T15:46:14+5:302021-05-13T15:53:12+5:30

CoronaVirus News : जवळपास 10 दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

telangana doctor died due to covid 19 after giving birth to her baby one week ago | CoronaVirus News : सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत

CoronaVirus News : सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत

Next
ठळक मुद्देडॉ. फराह यांनी शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस केले आणि हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलममधून बालरोगशास्त्रात ( पीडियाट्रिक्स) एमडी केले होते.

हैदराबाद : तेलंगणामधील एका डॉक्टरची मुलाला जन्म दिल्यानंतर एका आठवड्यातच कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. हैद्राबादमधील जुन्या शहरातील प्रिंसेस एसरा हॉस्पिटलमधील 31 वर्षीय डॉक्टर फराह निलोफरचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. गजवेलमधील सरकारी हॉस्पिटलमधील डॉ. फराह या कोरोना साथीच्या काळात काम करत होत्या. तसेच, आपल्या सहकाऱ्यांनी दिलेल्या सुचनेनंतरही त्यांनी प्रसूती रजेचा लाभ घेतला नाही. मात्र, अखेर आई बनल्यानंतर आठवड्यातच त्यांचा कोरोनामुळे अंत झाला.

आपल्या समर्पणासाठी परिचित असलेल्या डॉ. फराह बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) काम करत होत्या आणि कोविड लसीकरण कर्तव्यावरही होत्या. जवळपास 10 दिवसांपूर्वी त्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉ. फराह यांनी शादान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधून एमबीबीएस केले आणि हैदराबादच्या निलोफर हॉस्पिटलममधून बालरोगशास्त्रात ( पीडियाट्रिक्स) एमडी केले होते.

(Corona Antibodies : कोरोना झाल्यानंतर किती महिने राहू शकतात अँटीबॉडीज? वाचा सविस्तर)

तीन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवले होते
गजवेलमधील एरिया हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल एसोसिएट म्हणून तैनात होत्या. कोरोनामुळे तरुण डॉक्टरच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वारंगलमधील काकतीय मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापक हेमा बिंदू यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. फराह यांचे कोरोनामुळे निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते.

doctor died after a week of delivery

तेलंगाणामध्ये कोरोनामुळे २१ डॉक्टरांचा मृत्यू
हेमा बिंदू म्हणाल्या की, ' डॉ. फराह एक अतिशय हुशार, गतिशील व उत्साही डॉक्टर आणि खूप समर्पित बालरोग तज्ज्ञ होत्या.' तेलंगणाने कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेत आतापर्यंत २१ डॉक्टर गमावले आहेत. दरम्यान, तेलंगणाच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारणांसाठी काम करणारी संस्था हेल्थकेअर रिफॉर्म्स डॉक्टर्स असोसिएशनने कर्तव्यावर असताना कोरोनामुळे बळी पडलेल्या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

(Corona Vaccine : कोरोनापासून बरे झाल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी लस?, वाचा एक्सपर्ट्सचे म्हणणे...)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: telangana doctor died due to covid 19 after giving birth to her baby one week ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app