मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रेवंत रेड्डी अ‍ॅक्शन मोडमध्ये; ६ गॅरंटी योजनेवर केली सही

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 05:31 PM2023-12-07T17:31:12+5:302023-12-07T17:33:45+5:30

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंत रेड्डी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रचारादरम्यान जनतेला दिलेले आश्वसन पूर्ण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

telangana cm revanth reddy approves 6 poll guarantees provides job to disabled woman | मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रेवंत रेड्डी अ‍ॅक्शन मोडमध्ये; ६ गॅरंटी योजनेवर केली सही

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच रेवंत रेड्डी अ‍ॅक्शन मोडमध्ये; ६ गॅरंटी योजनेवर केली सही

हैदराबाद : तेलंगणाकाँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांनी आज दुपारी तेलंगणाचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हैदराबादमधील ए.बी. स्टेडियमवर त्यांचा शपथविधी सोहळा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीहून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही उपस्थित राहिले होते. ५६ वर्षीय रेवंत रेड्डींसह ११ आमदारांचा मंत्रीपदासाठीचा शपथविधी झाला.  

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रेवंत रेड्डी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. प्रचारादरम्यान जनतेला दिलेले आश्वसन पूर्ण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. प्रचारादरम्यान काँग्रेसकडून जाहीर केलेल्या ६ गॅरंटी योजनेच्या फाईलवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सही केली आहे. तसेच दिव्यांग महिलांना नोकरी देण्याच्या आश्वासनाच्या फाईलवरही सही केली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसने ६ गॅरंटी दिली होती. काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल, तेव्हा पहिली सही ही ६ गॅरंटी योजनेवर केली जाईल, असे आश्वासन काँग्रेसकडून दिले होते. आता हे आश्वसन रेवंत रेड्डी यांनी सरकार येताच पूर्ण केले आहे.

काय आहे ६ गॅरंटी योजना?
- महालक्ष्मी योजना- महिलांना दरमहा २५०० आणि ५०० रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार. तसेच राज्य परिवहन TSRTC बसमध्ये मोफत प्रवास.
- राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये आणि शेतमजुरांना १२ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार.
- ज्योती योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज दिली जाणार.
- इंदिरम्मा इंदलू योजना- ज्या कुटुंबांकडे स्वतःचे घर नाही त्यांना घरासाठी जमीन आणि ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार.
- युवा विकास योजना - विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांची मदत केली जाणार. या रकमेचा उपयोग विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची फी भरण्यासाठी होईल.
- चेयुथा योजना- वृद्ध आणि दुर्बलांना ४,००० रुपये पेन्शन दिली जाणार.

काँग्रेसने तेलंगणात ६४ जागा जिंकल्या
काँग्रेस हायकमांडने मंगळवारी रेवंत रेड्डी यांना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे (CLP) नेते आणि तेलंगणाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव केला आणि एकूण ११९ जागांपैकी ६४ जागा जिंकल्या. सत्ताधारी  भारत राष्ट्र समितीला ३९ जागांवर समाधान मानावे लागले.

Web Title: telangana cm revanth reddy approves 6 poll guarantees provides job to disabled woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.