“PM मोदी सरकारं पाडण्यात व्यस्त, आतापर्यंत ९ पाडली, हा एक विक्रमच”; केसीआर यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 07:06 PM2022-07-02T19:06:03+5:302022-07-02T19:07:09+5:30

परिवर्तनासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत केसीआर यांनी यशवंत सिन्हा यांचे कौतुक केले आहे.

telangana cm k chandrasekhar rao criticized pm narendra modi and support yashwant sinha to presidential election | “PM मोदी सरकारं पाडण्यात व्यस्त, आतापर्यंत ९ पाडली, हा एक विक्रमच”; केसीआर यांचा घणाघात

“PM मोदी सरकारं पाडण्यात व्यस्त, आतापर्यंत ९ पाडली, हा एक विक्रमच”; केसीआर यांचा घणाघात

Next

हैदराबाद: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही राजकीय घडामोडींचा वेग कमी झालेला दिसत नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ३९ आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपद गमावण्याची नामुष्की ओढवली. या सत्ता संघर्षाची चर्चा अवघ्या देशभर आहे. यातच विरोधकांकडून भाजपवर टीका केली जात असून, तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा यांच्यासह भाजपशासित १९ राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होत आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तेलंगाणा राष्ट्र समितीने राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन करत शक्ती प्रदर्शन केलेय. तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

आतापर्यंत ९ सरकारे पाडली आहेत, हा एक विक्रमच केलाय

तुम्ही राज्यातील सरकारे पाडण्यात व्यस्त आहात. आतापर्यंत तुम्ही नऊ सरकारे पाडली आहेत. तुम्ही हा एक विक्रमच केलाय, या शब्दांत केसीआर यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. तेलंगाणाचे के मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रपतीपदाचे विरोधीपक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत केले. तर, दुसरीकडे विमानतळावर पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी गेले नाहीत. पंतप्रधान मोदी यांचे स्वागत न करत त्यांनी  शासकीय शिष्टाचारचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे. तसेच दोन्ही उमेदवाराची तुलना करायला हवी. तुमच्या विजयाने देशाची मान उंचावेल. देशात अनेक चुकीचे विषय आणि घटना घडत आहेत. परिवर्तनासाठी सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे, असे सांगत केसीआर यांनी यशवंत सिन्हा यांचे कौतुक केले आहे. 

दरम्यान, शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस भाजप कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बौठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे १९ मुख्यमंत्री सहभागी होणार आहे. हैदराबादमध्ये कार्यकारणीची बैठक घेत भाजप दक्षिणेत पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षी तेलंगणामध्ये निवडणुका होणार आहेत.
 

Web Title: telangana cm k chandrasekhar rao criticized pm narendra modi and support yashwant sinha to presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.