शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देश तुमच्या वडिलांची जहागीर आहे का?, चंद्रशेखर राव यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 08:59 IST

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या मैदानात चांगलीच कंबर कसून उतरले आहेत.

ठळक मुद्देदेश तुमच्या आजोबा-वडिलांची जहागीर आहे का? -चंद्रशेखर रावदेशात लोकशाही आहे, किती दिवस सत्तेत राहणार आहात?, मोदींवर टीकापंतप्रधान मोदींच्या प्रत्युत्तराकडे सर्वांचं लक्ष

हैदराबाद - तेलंगणा विधानसभा निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या मैदानात चांगलीच कंबर कसून उतरले आहेत. विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर बोचऱ्या शब्दांत टीका केली जाते आहे. तर सत्ताधारीदेखील त्याच पद्धतीनं विरोधकांना प्रत्युत्तर देत आहेत. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधकांकडून वैयक्तिक स्वरुपातील टीका-टिप्पणी सुरूच आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना वादग्रस्त विधान केले आहे. 

'भारत देश तुमच्या आजोबा किंवा वडिलांची जहागीर नाही', असे विधान के.चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना केले आहे. बुधवारी (28 नोव्हेंबर) प्रचारादरम्यान जनतेला संबोधित करताना चंद्रशेखर राव यांनी मोदींवर तिखट शब्दांत हल्लाबोल चढवला. आपल्या खास शैलीमध्ये राव यांनी मोदींसमोर काही प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावर निशाणा साधला. भारत तुमच्या आजोबा-वडिलांची जहागीर आहे का?. येथे लोकशाही आहे. तुम्ही किती दिवस सत्तेत राहणार आहात?, असे बोचरे प्रश्न त्यांनी मोदींना विचारले आहेत.

तेलंगणातील आदिवासी आणि मुस्लिमांसाठीचे आरक्षण वाढवून देण्यास परवानगी न दिल्यामुळे चंद्रशेखर राव यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला आहे.  यावेळेस त्यांना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाचाही हवाला दिला. 'मी केवळ यासंदर्भातील प्रस्ताव देण्यासाठी दिल्लीला गेलो नव्हतो. केंद्र सरकारला यापूर्वीही आरक्षणासंबंधी 30 पत्रेही लिहिली आहेत. आमच्या मंत्र्यांनीही दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेऊन प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली होती. आता ते म्हणत आहेत की, ते हा प्रस्तावही मंजूर करणार नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही.'

पुढे ते असंही म्हणाले की, जेव्हा केंद्रात भाजपा-काँग्रेस यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची सत्ता येईल, तेव्हाच तेलंगणाला न्याय मिळेल.

टॅग्स :Telangana Assembly Election 2018तेलंगणा विधानसभा निवडणूक 2018Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत