लालूप्रसाद यादवांचा मुलगा शंकराच्या वेशात अवतरतो तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 14:45 IST2018-07-31T14:45:22+5:302018-07-31T14:45:59+5:30
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्या धार्मिक वृत्तीसाठी चर्चेत असतात. आताही ते अशाच कारणासाठी चर्चेत आले आहे.

लालूप्रसाद यादवांचा मुलगा शंकराच्या वेशात अवतरतो तेव्हा...
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे आपल्या धार्मिक वृत्तीसाठी चर्चेत असतात. आताही ते अशाच कारणासाठी चर्चेत आले आहे. तेजप्रताप यादव मंगळवारी पाटण्यामध्ये शंकरच्या अवतारात दिसून आले. श्रावण महिन्यात शिवशंकराची पूजा करण्यासाठी देवघर येथे जाण्यापूर्वी तेजप्रताप यांनी पाटणा येथे पूजाआर्चा केली. त्यावेळी त्यांनी केलेली आगळीवेगळी वेशभूषा चर्चेचा विषय ठरली.
#WATCH: RJD leader Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva offers prayers at a Shiva temple in Patna before leaving for Baba Baidyanath Dham in Deoghar pic.twitter.com/gdBViBmofH
— ANI (@ANI) July 31, 2018
तेजप्रताप यांनी शिवशंकराप्रमाणे कंबरेला व्याघ्रचर्माप्रमाणे दिसणारा कपडा गुंडाळला होता. तसेच भगव्या रंगाची वस्त्रे परिधान करून त्यांनी अन्य शिवभक्तांसोबत शिवमंदिरात पूजा केली. यावेळी शंख फुंकून देवाची आराधना करतानाही ते दिसून आले. येथे पूजा केल्यानंतर तेजप्रताप आपल्या पाठिराख्यांसह बाबाधामच्या दिशेने रवाना झाले. बिहार आणि झारखंडमधील भाविक देवघर येथे जाऊन शिवशंकरांचा जलाभिषेक करतात.
RJD leader Tej Pratap Yadav dressed up as Lord Shiva offers prayers at a Shiva temple in Patna before leaving for Baba Baidyanath Dham in Deoghar pic.twitter.com/W8KNyMkiOw
— ANI (@ANI) July 31, 2018
आपल्या धार्मिकतेसाठी चर्चेत येण्याची तेजप्रताप यांची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी एकदा तेजप्रताप यांनी भगवान श्रीकृष्णाचा वेश धारण करून श्रीकृष्णाची पूजा केली होती.