सीबीआय चार्जशीटमध्ये तेजप्रताप यादव यांचे नाव, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 05:44 IST2024-06-09T05:41:42+5:302024-06-09T05:44:03+5:30
Tej Pratap Yadav News: रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन ताब्यात घेतल्याचे आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

सीबीआय चार्जशीटमध्ये तेजप्रताप यादव यांचे नाव, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ
- एस. पी. सिन्हा
पाटणा - रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन ताब्यात घेतल्याचे आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. याप्रकरणी सीबीआयने पहिल्यांदाच लालूप्रसाद यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा आरोपपत्रात उल्लेख केला आहे. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात लालूप्रसाद यादव व अन्य ७७ आरोपींची नावे आहेत.
तेजप्रताप यादव यांचे नाव आरोपपत्रात असणे हे राजदसाठी धक्कादायक आहे. लालूप्रसाद यादव यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची बिकट अवस्था झाली आहे. गैरव्यवहारांमध्ये या कुटुंबातील लोकांचे हात गुंतलेले आहेत, असे भाजपने म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते रामसागर सिंह यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर यात्रेनंतर आता तेजस्वी यादव तुरुंगाची यात्रा करणार आहेत. नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन ताब्यात घेण्याबाबत जे गैरव्यवहार झाले त्यात लालूप्रसाद यादव यांनी रेल्वेतील काही अधिकारी, कर्मचारी यांनाही अडकविले आहे.