तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:39 IST2025-10-13T18:35:56+5:302025-10-13T18:39:25+5:30
तेज प्रताप यादव यांनी नव्याने स्थापन झालेल्या जनशक्ती जनता दलाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत २१ उमेदवारांची नावे आहेत.

तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. तेज प्रताप यादव यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती जनता दलाने बिहार निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची घोषणा केली आहे. तेज प्रताप यादव महुआ विधानसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. जयसिंग राठी यांना महनार, रवी राज कुमार यांना हिसुआ, मदन यादव यांना शाहपूर आणि मीनू कुमारी यांना पटना साहिब येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
तेज प्रताप यांना राजदच्या मधून काढण्यात आले. यानंतर त्यांनी जनशक्ती जनता दलाची स्थापना केली. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला आहे. आता नेमका कोणत्या पक्षाला याचा फायदा होणार आहे, हे निकालामध्येच समोर येणार आहे.
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
तेज प्रताप यादव यांच्या पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार, शंकर यादव मानेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीत बेलसन येथून विकास कुमार कवी, बख्तियारपूर येथून गुलशन यादव, बिक्रमगंज येथून अजित कुशवाह, जगदीशपूर येथून नीरज राय, अत्री येथून अविनाश, वजीरगंज येथून प्रेम कुमार, बेनीपूर येथून अवध किशोर झा, दुमाओ येथून दिनेश कुमार सूर्या, गोविंदगंज येथून आशुतोष, मधेपुरा येथून संजय यादव आणि नरकटियागंज येथून तौरीफ रहमान यांचा समावेश आहे.
२०२० च्या निवडणुकीत तेज प्रताप यादव यांनी निवडणूक लढली होती?
जनशक्ती जनता दलाने बरौली येथून धर्मेंद्र क्रांतीकारी, कुचायकोट येथून ब्रज बिहारी भट्ट, बनियापूर येथून पुष्पा कुमारी आणि मोहिउद्दीन नगर येथून सुरभी यादव यांना उमेदवारी दिली आहे.
या वर्षी तेज प्रताप यादव यांना त्यांचे वडील आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलातून काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. तेज प्रताप यादव हे बिहार सरकारमध्ये पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री होते.
२०२० मध्ये तेज प्रताप यादव यांनी राजदच्या तिकिटावर हसनपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही जागा समस्तीपूर जिल्ह्यात येते. यावेळी ते वैशाली जिल्ह्यातील महुआ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.