तंत्रज्ञान स्थानिक असायला हवे -मोदी
By Admin | Updated: August 23, 2014 02:00 IST2014-08-23T02:00:12+5:302014-08-23T02:00:12+5:30
सामान्य जनतेच्या समस्यांवर अभिनव तोडगा काढण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटी) एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
तंत्रज्ञान स्थानिक असायला हवे -मोदी
नवी दिल्ली : सामान्य जनतेच्या समस्यांवर अभिनव तोडगा काढण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी (आयआयटी) एकत्र येण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भारत ज्या उत्पादनाच्या आयातीवर अवलंबून आहे, त्याचे उत्पादन करण्याचे आव्हान आयआयटींनी स्वीकारले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
राष्ट्रपती भवनात आयआयटी बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष आणि संचालकांची परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदी बोलत होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते.
विज्ञान सर्वव्यापी आहे, तंत्रज्ञान स्थानिक असायला हवे, असे सांगून देशातील जनतेच्या जीवनात सकारात्मक बदल आणण्याचे आवाहन पंतप्रधानांनी आयआयटीला केले. भारत आयातीवर असलेले अनेक क्षेत्रंचा उल्लेख मोदींनी केला. यामध्ये प्रामुख्याने संरक्षण उपकरणो, आरोग्य यासह चलनाच्या छपाईसाठी लागणारी शाई आणि अश्रूधुराच्या नळकांडय़ा यासारख्या संवेदनशील आणि सुरक्षा संबंधी वस्तूंचा देखील समावेश आहे. त्यांनी अशा वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक प्रतिभा भारतात असल्याचे प्रतिपादन केले.
या वस्तू तयार करण्यासाठी आवश्यक प्रतिभा आपल्या देशात नाही, यावर आपला विश्वास नाही, असे सांगून आयआयटींनी अशा वस्तूंच्या निर्मितीचे आव्हान स्वीकारावे असे आवाहनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
मोदींविरुद्धचा खटला मागे
4लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सुरू असलेली खटल्याची कार्यवाही महानगर दंडाधिका:यांनी शुक्रवारी मागे घेतली. गुजरात पोलिसांनी मोदींना क्लीन चिट देत याबाबत सादर केलेले प्रकरण बंद करण्यासंबंधी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्वीकारत दंडाधिका:यांनी खटला रद्द करण्याचा आदेश दिला.आचारसंहितेच्या उल्लंघनाचा कोणताही गुन्हा घडला नसल्यामुळे कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे पटेल यांनी स्पष्ट केले.