किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशावर संघ नाराज नाही
By Admin | Updated: January 18, 2015 02:00 IST2015-01-18T02:00:51+5:302015-01-18T02:00:51+5:30
माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशाबाबत सरसंघचालक मोहन भागवत हे नाराज असल्याच्या बातम्यांना संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी फेटाळले.

किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशावर संघ नाराज नाही
नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या भाजप प्रवेशाबाबत सरसंघचालक मोहन भागवत हे नाराज असल्याच्या बातम्यांना संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी फेटाळले. सरकार व संघ यांच्यात फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला.
सोशल नेटवर्किंग साईट टिष्ट्वटरवर वैद्य यांनी, भाजपात किरण बेदी यांनी केलेल्या प्रवेशाला भागवत यांनी नाकारल्याचे वृत्त निराधार असून ते कुटिल वृत्तीने पसरवले आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)