शिक्षक संघाचे धरणे आंदोलन
By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:07+5:302015-03-20T22:40:07+5:30
लातूर : आर.टी.ई. नियमातील जाचक अटी रद्द कराव्यात तसेच ५ वी ते ७ वीच्या वर्गांना पूर्वीप्रमाणे प्रत्येक वर्ग तुकडीला १.३ व ८ वी ते १० वीच्या वर्ग तुकडींना १.५ शिक्षक मंजूर करावेत. एक वर्ग तुकडीला एक शिक्षक या धोरणाचा फेरविचार करावा, या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले.

शिक्षक संघाचे धरणे आंदोलन
ल तूर : आर.टी.ई. नियमातील जाचक अटी रद्द कराव्यात तसेच ५ वी ते ७ वीच्या वर्गांना पूर्वीप्रमाणे प्रत्येक वर्ग तुकडीला १.३ व ८ वी ते १० वीच्या वर्ग तुकडींना १.५ शिक्षक मंजूर करावेत. एक वर्ग तुकडीला एक शिक्षक या धोरणाचा फेरविचार करावा, या प्रमुख मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील वर्ग तुकडी टिकविण्याचे जाचक निकष रद्द करावेत, शालेय शिक्षकांची संख्या निश्चित करताना शालेय कार्यभार विचारात घ्यावा, वर्गातील पटसंख्या विषयनिहाय तासिका, अध्यापनाचे तास, प्रात्यक्षिक कार्य, शालेय उपक्रम आदी आधारे शाळेतील शिक्षकांची संख्या निश्चित करण्याचे जुने सूत्र कायम ठेवावे, अशीही मागणी शिक्षण उपसंचालकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर पी.एस. घाडगे, व्ही.जी. पवार, गोविंद निटुरे, विश्वंभर भोसले, आनंद भंडारे, एस.एस. विश्वासराव, ए.व्ही. मोरे, पी.एस. शिंदे, सुभाष पाटील, अशोक मस्के, जी.व्ही. माने, जी.जी. रातोळे यांची नावे आहेत.